फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉसच्या घरातले नवे वर्ष सेलिब्रेशन : २०२५ नव वर्ष सुरू व्हायला फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. जगभरामध्ये नवीन वर्ष साजरे केले जाणार आहे. टेलिव्हिजनवरचा चर्चित आणि रिॲलिटी शो बिग बॉस १८ सध्या टीआरपीच्या सीमा पार करत आहे. शोचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे शोचा फिनाले फक्त दोन आठवडे दूर आहे. नुकताच झालेल्या विकेंडच्या वॉरमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये सलमान खानचा वाढदिवस मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
आता नवे वर्ष उजडायला फक्त काही तास शिल्लक असताना बिग बॉसच्या घरामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार घरामध्ये एन्ट्री करणार आहेत. यावेळी घरामधील सदस्यांचे त्याचबरोबर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सेलिब्रेटी घरामध्ये धमाल करताना दिसणार आहेत. आगामी भागामध्ये मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, समर्थ जूयाल, करण कुंद्रा आणि भारती सिंग हे कलाकार घरामध्ये नवीन वर्षाची धमाल करताना बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबत दिसणार आहेत.
कलर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये भारताचा प्रसिद्ध कॉमेडियन आणि बिग बॉस १७ चा विजेता मुनावर फारुकी घरामध्ये एन्ट्री करणार आहे. यामध्ये तो घरातील सदस्यांना रोस्ट करताना दिसणार आहे. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सर्वात आधी मुनावर म्हणतो रजतला की हे सगळे तुला यूटर्न यूटर्न म्हणत आहेत हे अजून लहान आहेत. त्यांना तुझे ड्रायव्हिंग स्किल्स नाही माहिती. त्यानंतर तो करणला म्हणतो की, करण भाऊ तुला माहिती आहे का नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये एक राज्य आहे तुला माहिती आहे का यावर सगळे म्हणतात की अरुणाचल… मुनावर म्हणतो की नाही तुझं सासर.. भारताचे राज्य अशाच प्रकारे ओळखले जाणार आहेत यावर करणच सासर १, करणच सासर २… त्यानंतर सगळे घरातले सदस्य हसतात.
Munawar ne nahi chhodi koi bhi kasar, chehron par hasi bata rahi hai roast session ka asar. 😂✨
Dekhiye #BiggBoss18, aaj raat 10 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic #GoCheese#BiggBoss18 #BiggBoss #BB18… pic.twitter.com/zkHqxQ6ys6
— Bigg Boss (@BiggBoss) December 31, 2024
आज भारताची कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि करण कुंद्रा घरामध्ये एंट्री करणार आहेत. यावेळी भारती आणि करण आल्यावर करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा या दोघांना बोलावतात आणि म्हणतात की तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल काही खराब गोष्टी सांगायच्या आहेत. यावेळी करणवीर म्हणतो की, माझी पार्टनर खूप कमी बोलते. त्यानंतर अविनाश इशा सिंहबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतो यावेळी भारती येते आणि त्याचे अश्रू पसते आणि म्हणते की रडू नकोस..
Har aam mard ke dukh, dard aur peeda ki kahaani, suniye Avinash aur Karan ki zubaani. 🤣
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #Harpic #GoCheese#BiggBoss18… pic.twitter.com/meKlVVotpz
— ColorsTV (@ColorsTV) December 31, 2024