फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस 18 क्लोजिंग व्होटिंग ट्रेंड : बिग बॉस १८ चा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. कालपर्यत बिग बॉसने टॉप ७ स्पर्धकांपैकी एक स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी वोटिंग सुरु केली होती. सध्या घरामध्ये रजत दलाल, विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दारंग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा आणि इशा सिंह हे सदस्य घरामध्ये आहेत. यामधील एक सदस्याला फिनाले आधी घराबाहेर केले जाणार आहे. यामध्ये कोणता सदस्य फिनालेच्या एवढ्या जवळ येऊन घराबाहेर होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
Bigg Boss 18 : फिनालेपूर्वी रजत दलालचा ‘नकली’ खेळ केला उघड, पत्रकारांनी केले आरोप
सलमान खानच्या शो बिग बॉस १८ च्या शेवटच्या नॉमिनेशनचे क्लोजिंग ट्रेंड उघड झाले आहेत. परंतु आम्ही याची पुष्टी करत नाही. बिग बॉस 18 च्या आतल्या बातम्या देणाऱ्या द खबरी तकच्या वृत्तानुसार, शिल्पा शिरोडकर आणि ईशा सिंह शेवटच्या दोन ठिकाणी आहेत. या दोघांनाही आता आठवड्याच्या मध्यावर बेदखल करण्याचा धोका आहे. असे वोटिंग ट्रेंडमध्ये सांगण्यात आले आहे.
परंतु कलर्सचा चेहरा म्हणजेच इशा सिंहला घरामध्ये ठेवण्यासाठी, बिग बॉसचे निर्माते शेवटच्या क्षणी कोणतेही बदल करू शकतात. नवीनतम मतदान ट्रेंडनुसार, सुरक्षित स्पर्धकांमध्ये रजत, विवियन, करण, चुम दरंग आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश आहे. तर, ईशा सिंग आणि शिल्पाची नावे सर्वात खालच्या दोनमध्ये आहेत. बघण्यासारखी गोष्ट म्हणजे चुम दारंग आणि अविनाश टॉप ३ मध्ये नाहीत. शिवाय बिग बॉस शेवटचा येऊन काही धमाका करणार का, असा प्रश्नही आहे.
Breaking #BiggBoss18 !!!
CLOSING VOTING TRENDS
🥇#VivianDSena✅
🥈#RajatDalal✅
🥉#KaranveerMehra ✅
⭐️#AvinashMishra✅
⭐️#ChumDarang✅
⭐️#EishaSingh❌
⭐️#ShilpaShirodkar❌Note : As per Google & YouTube also @VivianDsena01 & Rajat are top 2 & Eisha & Shilpa are at bottom…
— The Khabri Tak (@TheKhabriTak) January 14, 2025
उल्लेखनीय आहे की सध्या बिग बॉस १८ च्या घरात सात स्पर्धक उपस्थित आहेत, ज्यात करणवीर मेहरा, विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर, चुम दारंग, रजत दलाल, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांचा समावेश आहे. नुकतेच मीडिया शोच्या घरी आले होते आणि घरातील सदस्यांना मीडियाच्या तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. बिग बॉस १८ सध्या त्याच्या फिनालेच्या अगदी जवळ आला आहे आणि शोला त्याच्या १८ व्या सीझनचा विजेता मिळण्यासाठी फक्त काही वेळ शिल्लक आहे, त्यामुळे शोच्या फिनालेसाठी लोकांमध्ये उत्साहही पाहायला मिळत आहे.
बिग बॉस १८ च्या फिनालेबद्दल बोलायचे झाले तर, शोचा फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे आणि फिनाले रात्री ९:३० वाजता सुरू होईल. मात्र, शोच्या या सीझनची ट्रॉफी कोण आणते हे पाहणे बाकी आहे. याशिवाय टॉप फाइव्हमध्ये कोणाचा समावेश होणार याची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. नुकतीच या शोची ट्रॉफीही समोर आली आहे. निर्मात्यांनी एक प्रोमो जारी केला आहे आणि यावेळच्या ट्रॉफीची एक झलक चाहत्यांसह शेअर केली आहे.