फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजनवरचा चर्चित शो रिऍलिटी शो बिग बॉस १८ चा फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा शोचे मेकर्स घरातल्या सदस्यांसंसमोर अनेक नवनवीन आव्हानं समोर आणत आहेत. या आठवड्यामध्ये घरातली टाईम गॉड श्रुतिका अर्जुन झाली या खेळामध्ये घरातले सदस्यांनी एकमेकांशी मांडवली करून तिला आणि चुमला टाईम गॉड बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसले. एवढेच नव्हे तर श्रुतिका अर्जुन हिने स्वतःच्या फायद्याचा विचार करत स्वतः टाईम गॉड झाली आणि तेराव्या आठवड्यामध्ये पोहोचली. कालच्या भागामध्ये आता याच विषयावर बिग बॉसने करणवीर मेहरा, चुम दारंग आणि अविनाश मिश्रा यांना कन्फेशन रूममध्ये बोलवले होते. त्यानंतर त्या तिघांना बिग बॉसने कालच्या घटनेची व्हिडिओ दाखवली आणि त्यांना त्याच्या नात्याबद्दल आरसा दाखवला.
Bigg Boss 18 : नॉमिनेशनमध्ये नवा ट्विस्ट! बिग बॉस नवी टाइम गॉड श्रुतिका अर्जुनला फटकारले
कालच्या भागामध्ये टाईम गॉड श्रुतिका अर्जुनला बिग बॉसने नॉमिनेशनमध्ये फेरबदल करण्याची संधी दिली होती, यामध्ये बिग बॉसने घरातले राशन पणाला लावले होते. त्यानंतर नॉमिनेशनच्या प्रक्रियेमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले होते. त्यानंतर बिग बॉसला उर्वरित राशनची मागणी श्रुतिकाने केली यामध्ये बिग बॉसने टाईम गोडला फटकारले आणि सर्व राशन देऊन टाकले. यावेळी सर्व राशन देऊन बिग बॉसने घरातल्या सर्व सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले आहे.
आता कालच्या भागानंतर सोशल मीडियावर नवा प्रोमो आला आहे. यामध्ये घरात मिड विक एव्हिक्शन आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर बिग बॉसचे चाहते त्याचबरोबर पाहणारे प्रेक्षक संतापले आहेत. सोशल मीडियावर बिग बॉस खबरी पेजवर माहिती देण्यात आली आहे की घरातल्या सदस्यांनी दिग्विजय राठीला घराबाहेर काढले आहे.
🚨 BREAKING & EXCLUSIVE!
Digvijay Rathee is EVICTED from Bigg Boss 18 house.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 19, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस घरातल्या सदस्यांना सांगतात की, आज एलिमिनेशन होणार आहे आणि आज कोणाचा तरी टाईम संपणार आहे. यामध्ये सर्वात आधी रजत दलाल येतो आणि दिग्विजय राठीच नाव घेऊन म्हणतो की त्याने मला फसवल आहे मैत्रीमध्ये म्हणून मी त्याला घराबाहेर जाण्यासाठी मत देत आहे. त्यानंतर करणवीर मेहरा येतो आणि यामिनी मल्हत्रोच नाव घेतो आणि म्हणतो की माझं यामिनी सोबत कोणतंही नातं नाही आहे. शिल्पा शिरोडकर येते आणि एडिन रोझच नाव घेते. त्यानंतर बिग बॉस प्रो नाव घेत नाही परंतु दिग्विजय राठी घराबाहेर झाला आहे. यावेळी प्रोमो मध्ये करंविर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे आणि चुम दरांग भावूक होताना दिसत आहेत. आगामी भागामध्ये यासंदर्भात काय होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.