(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धकांचा खेळ पाहताना बिग बॉस प्रेमींना जास्त मज्जा येत आहे. नुकताच घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतले. या टास्कनंतर या घरातील काही सदस्य पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत. याचदरम्यान निक्कीदेखील नॉमिनेट असल्यामुळे तिचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला आहे. तिने रागाच्या भरात अरबाजला खूप काही सुनावले आहे. योगिता आणि वैभव निक्कीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु निक्की कोणाचंच ऐकून घेत नाही आणि या दोघांमध्ये जोरदार भांडणं होतात.
बिग बॉसचा नवीन प्रोमो आला समोर
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान “तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता”, असे वैभव निक्कीला म्हणत आहे. त्यावर निक्की म्हणते, “ते गेलं खड्ड्यात… एवढं प्रेम दाखवून देखील मी नॉमिनेट झाली आहे.” असं ती वैभवला म्हणते. आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
नेटकऱ्यांनी दिला प्रतिसाद
सोशल मीडियावर बिग बॉसचा हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. एका यूजरने ‘तुला प्रेम नाही दाखवत ग येडे गबाळे तो तुला वेडी बनवत आहे आणि स्वतःचा गेम खेळत आहे ज्याचे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आता तर सुरुवात आहे निक्की. तुला अजून बरच काही पाहायचं आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने निक्कीला थेट घराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. ‘ए बाई तू जा ना घरा बाहेर… शांतता राहील घरामध्ये आणि जाताना तुझी चमची आहे ना तिला पण घेऊन जा’ अशी कमेंट करून चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.