जरांगेंच्या मागण्या, उपसमितीला आदेश; फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या गुप्त बैठकीत काय ठरलं?
Manoj Jarange Hunger Strike: मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांची शनिवारी मध्यरात्री अचानक प्रकृती बिघडली. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.डॉक्टरांनी जरांगे यांच्यावर प्राथमिक उपचार केले. एकीकडे जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे, दुसरीकडे मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारमध्येही खळबळ माजली आहे. या सगळ्यात काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या वर्षा बंगल्यावर एक गुप्त बैठक झाली.
दरम्यान काल मराठा उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेटही घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहणा असल्याची भूमिका स्पष्ट केली. न्या. शिंदे याचे शिष्टमंडळ माघारी परतल्यानंतर शनिवारी रात्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. तीनही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यानंतर गिरीश महाजन आणि विखे पाटील गुपचूप वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले.
Dombivali Crime: संतापजनक! सोशल मीडियावरून जाळ्यात ओढलं, अश्लील व्हिडीओ काढले आणि व्हायरल केले…
मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शनिवारी रात्री मुख्यमंत्री, उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुप्त बैठक झाली. जवळपास एक तास चाललेल्या या चर्चेत मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना होणाऱ्या फटक्यांवर विशेष चर्चा झाली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे या मुद्यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत उपसमितीला दोन दिवसांत निर्णय घेऊन जरांगे यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. बैठक संपल्यानंतर विखे-पाटील आणि महाजन खासगी वाहनातून बाहेर निघाले.
कालच्य बैठकीनंतर आज (३१ ऑगस्ट) पुन्हा एकदा मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. राधाकृष्ण विखेपाटील यांनी सकाळी ११ वाजता ही बैठक बोलवली असून त्यांच्या रॉयलस्टॉन या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांवर आज तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याचे माहिती न्या. संदीप शिंदे यांनी जरांगे यांना दिली. मात्र जरांगे सातारा संस्थानचे गॅझेटही तत्काळ लागू करण्यावर आग्रही असल्याने पूर्ण मार्ग काढता आलेला नाही. औंध संस्थान आणि बॉम्बे गॅझेटबाबत निर्णय घेण्यास जरांगे यांनी वेळ देण्याची तयारी दाखविली आहे. त्याचबरोबर अन्य मागण्यांवरही जरांगे ठाम आहेत, त्यामुळे आजच्या बैठकीत या सर्व मुद्यांवर निर्णय होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Manoj Jarange Hunger Strike: मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड; शरद पवार आज भेट घेणार?
मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याने “मराठा कुणबी एकच आहेत” असा सरसकट आदेश (जीआर) काढण्याची मागणी मनोज जरांगेंकडून करण्यात आली आहे. . मात्र, न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने या नोंदींचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच, फक्त नोंदींचा अभ्यास करूनच सरसकट आदेश काढता येईल. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालही आवश्यक आहे. असं शिंदे समितीने सांगितले. समितीने या प्रक्रियेस काही महिन्यांचा वेळ मागितला असून, त्यामुळे सरसकट आदेश लवकरच लागू होणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.