(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
चित्रपट एडिटर निषाद युसूफ यांचे निधन झाले आहे. निषाद हा अभिनेता सूर्या आणि बॉबी देओलचा आगामी चित्रपट ‘कांगुवा’चा चित्रपटाचे एडिटर होते. मंगळवारी रात्री ते कोचीच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. इंडिया टुडेने मल्याळम मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत दावा केला आहे की निशाद युसूफचा मृतदेह कोची येथील त्याच्या घरात सापडला आहे. अद्यापही त्यांच्या मृत्यूचे कारण पोलिसांकडून उघड झाले नसून पोलिस या मृत्यूमागचे कारण शोधण्यात व्यस्त आहेत.
FEFKA ने पुष्टी केली
फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ (FEFKA) डायरेक्टर्स युनियनने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर निशाद युसूफच्या मृत्यूची पुष्टी केली. चित्रपट युनिटने प्रसिद्ध संपादकाचा फोटो शेअर केला आणि मल्याळममध्ये लिहिले, ‘बदलत्या मल्याळम सिनेमाचे समकालीन भविष्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चित्रपट एडिटर निशाधा युसूफ यांचे अनपेक्षित निधन ही एक मोठी शोकांतिका आहे ज्याने मोठा धक्का बसला आहे. FEFKA डायरेक्टर्स युनियनने निषादच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.
हे देखील वाचा – नाही राहिली ‘फ्रेंड्स’मधील फोबी ॲबॉट, वयाच्या ७९ व्या वर्षी टेरी गैर यांनी घेतला अखेरचा श्वास!
पोलीस तपासात गुंतले आहे
प्रादेशिक प्रसारमाध्यमांनी त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे वृत्त दिले असले तरी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केरळ पोलीस मृत्यूचा तपास करत आहेत आणि त्यांनी कोणतीही शक्यता नाकारली नाही, असे मातृभूमीच्या वृत्तात म्हटले आहे.
कोण आहेत निषाद युसूफ?
निशाद युसूफ हे मल्याळम आणि तमिळ भाषेतील लोकप्रिय चित्रपट एडिटर होते. थल्लुमाला, उंडा, वन, सौदी वेलाक्का आणि एडिओस अमिगोस या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी गेल्या वर्षी त्याच्या सर्वात हाय-प्रोफाइल प्रोजेक्टवर काम केले होते, सुर्या आणि बॉबी देओल स्टारर पॅन-इंडिया चित्रपट कंगुवासही ते काम करत संपादक म्हणून काम करत होते. आता हा चित्रपट 14 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा – ‘सलमान खानला मारून टाकेन…’, सलग दुसऱ्या दिवशीही जीवे मारण्याची धमकी
उत्कृष्ट एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
निषाद यांना 2022 मध्ये थल्लुमालावरील कामासाठी सर्वोत्कृष्ट संपादकाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.