'सलमान खानला मारून टाकेन...', सलग दुसऱ्या दिवशीही जीवे मारण्याची धमकी (फोटो सौजन्य-X)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सलग दुसऱ्या दिवशी धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा उमेदवार जीशान सिद्दीकी आणि सलमानला धमकी देणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज मिळाला. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेज पाठवला आहे. यामध्ये दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी, मुंबई पोलिसांनी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही धमकी कोणी दिली हे सध्या स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज मिळाला. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. हे पैसे नाही मिळाले तर सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात 354 (2) आणि 308 (4) कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा: Salman Khan ला पुन्हा धमकी, तर झिशान सिद्दिकी रडारवर; फोन करत केली मोठी मागणी
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील वांद्रे भागात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा झीशानही टार्गेट केल्याचे बोलले जात होते. सिद्दीकी कुटुंबीय सलमानचे जवळचे मानले जातात.
निर्मल नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपींनी आधी आमदार झीशान सिद्दीकी यांच्या हेल्पलाइन नंबरवर धमकीचा संदेश पाठवला आणि नंतर त्यांना ‘व्हॉईस कॉल’ केला, ज्यामध्ये त्याने सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी घडली.
याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला नोएडा येथून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी आरोपीला मुंबईत आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने सांगितले की, हा फोन झीशानच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला होता.
हे सुद्धा वाचा: “हा एक कठीण काळ…”, सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप
दरम्यान, नोएडा पोलिस स्टेशन सेक्टर 39 चे प्रभारी निरीक्षक जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, नोएडा आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने सेक्टर 92 मधील एका निर्माणाधीन घरावर छापा टाकला आणि तेथून तय्यब अन्सारी नावाच्या व्यक्तीला अटक केली.
तसेच सलमान खानला सातत्याने धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती आणि सलमान खानलाही इशारा दिला होता. त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी धमक्या सुरूच आहेत. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान यांना नुकताच धमकीचा फोन आला आणि त्यानंतर सलमान खानलाही पुन्हा धमकी आली. पोलिसांनी तपास केला असता, धमकी देणारा व्यक्ती उत्तर प्रदेशातील नोएडा येथील २० वर्षीय तरुण होता. ज्याला अटक करण्यात आली.