फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : सध्या बिग बॉस 18 मध्ये खूप ड्रामा आणि मनोरंजन पाहायला मिळत आहे. शो जलद गतीने फिनालेच्या दिशेने जात आहे. त्यामुळे स्पर्धक त्याचे खेळामध्ये सर्वकाही फायनलमध्ये जाण्यासाठी झोकत आहेत. मागील आठवड्यात सदस्यांच्या कुटूंबियांना घरामध्ये बोलावण्यात आले होते. यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामा पाहायला मिळाला. अलीकडेच, वीकेंडच्या वॉरमध्ये, सलमान खानने चाहत पांडेच्या सिक्रेट बॉयफ्रेंडबद्दल एक मोठा खुलासा केला होता ज्यामध्ये त्याने सर्वांना एक फोटो दाखवला होता. या फोटोमध्ये चाहत केकसोबत दिसत होता.
Bigg Boss 18 : टाईमच्या खेळामध्ये बिग बॉसचा नवा ट्विस्ट! हे सदस्य अडकणार नॉमिनेशनच्या जाळ्यात
आता चाहत पांडेच्या आईने बिग बॉसला सडेतोड उत्तर दिले आहे. चाहत पांडेच्या आईने विकेंडमध्ये झालेल्या घटनेनंतर बिग बॉसच्या टीम खुले चॅलेंज दिले आहे. वीकेंड वारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने चाहत पांडेच्या सिक्रेट बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला आणि म्हटले की जर चाहतच्या आयुष्यात कोणी खास असेल तर तिने त्याच्याबद्दल सर्वांना सांगावे. सलमानने चाहतला वारंवार विचारले की ती हे प्रकरण का नाकारत आहे. चाहत पांडे सलमान खान आणि इतर सर्व स्पर्धकांना एकच गोष्ट वारंवार सांगत होता की असं काही नाही. यानंतर सलमान खानने सर्व स्पर्धकांना आणि लोकांना एक फोटोही दाखवला ज्यामध्ये ती केकसोबत दिसत होती. आता या चित्रावर चाहतला म्हणायचे होते की, त्यातील केक दुसऱ्याचा आहे.
आता एका खासगी वाहिनीशी बोलताना चाहत पांडेच्या आईने म्हटले आहे की, जर असे झाले की चाहतला एखादा आवडत असेल तर ती तिच्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत आनंदाने करेल. मग तो कोणत्या जातीचा असो. यासोबतच चाहतच्या आईने निर्मात्यांना खुले आव्हानही दिले की, जर त्यांना चाहतचा प्रियकर सापडला किंवा त्याचे नाव सांगितले तर ती त्यांना २१ लाख रुपये देईल. चाहतच्या आईने आपल्या मुलीला बॉयफ्रेंड नसल्याचं कडक शब्दात सांगितलं. झाले असते तर तिने त्यांना सांगितले असते.
Chahat Pandey’s mother has given OPEN CHALLENGE to the Bigg Boss makers
She says, “Agar makers Chahat ke boyfriend ka naam ya uska picture dhund ke lekar aate hai toh mein unhe 21 lacs prize money as cash dungi”
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 5, 2025
चाहत-अविनाश वाद
येथेही चाहत पांडे आणि अविनाश यांच्यात जोरदार वाद सुरू होता. अविनाश म्हणत राहिला की चाहत, तुझा बॉयफ्रेंड आहे हे संपूर्ण सेटला माहीत आहे, म्हणून सगळ्यांना सांग. तर चाहत म्हणाले की, तसे नसेल तर त्याने कबूल करावे.
मागील आठवड्यामध्ये झालेल्या फॅमिली वीकमध्ये चाहत पांडेच्या आईने अविनाश मिश्रा बरेच खडसावले होते. त्याचबरोबर चाहतच्या आईने अविनाश मिश्रा आणि रजत दलालवर आरोप देखील केले होते त्याचबरोबर त्याला बाहेरची धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणावरून विकेंडच्या वॉरमध्ये चाहत पांडेला सलमान खानने सुनावले होते.