(फोटो सौजन्य - Instagram)
अलिकडेच, लोकप्रिय दक्षिण अभिनेता धनुष आणि दिग्दर्शक ऐश्वर्या रजनीकांत त्यांच्या मोठ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी एकत्र आले होते. घटस्फोटित असूनही, दोघांनीही एकत्र येऊन त्यांच्या मुलाचे यश साजरे केले. धनुषने त्यांच्या मुलाच्या पदवीदान दिनाचे फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते खुश झाले आहेत. तसेच धनुष आणि ऐश्वर्या यांना सोबत चाहते आनंद व्यक्त करत आहेत आणि फोटो वर कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहे.
सोनू सूदने Miss World ओपल सुचाताला विचारला ‘हा’ प्रश्न; ज्याचे उत्तर ऐकून चाहते झाले चकीत!
धनुषला वाटला त्याच्या मुलाच्या कामगिरीचा अभिमान
शनिवारी धनुषने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा मुलगा आणि एक्स पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबतचे काही फोटो शेअर केले. हे फोटो त्याच्या मुलाच्या शाळेतील पदवीदान समारंभाचे आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि धनुष त्यांच्या मुलाला मिठी मारताना दिसत आहेत. धनुषने ‘गर्वित पालक’ असे कॅप्शनही लिहिले आहे. धनुष शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
धनुष साध्या शैलीत दिसला
धनुष नेहमीच त्याच्या साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकतो. त्याच्या मुलाच्या पदवीदान समारंभात तो साध्या लुकमध्येही दिसला. धनुषने पांढरा शर्ट, काळी पँट घातली होती. ऐश्वर्याने ऑफ-व्हाइट ड्रेस घातला होता. तर, दोघांचीही ही स्टाईल सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडली आहे. तसेच त्यांचा मुलगा यात्रा पदवीदान गणवेशात दिसत आहे.
गेल्या वर्षी घटस्फोटाची घोषणा
धनुषने १८ नोव्हेंबर २००४ रोजी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी २००६ मध्ये मुलगा यात्रा आणि २०१० मध्ये दुसरा मुलगा लिंगा याचा जन्म झाला. सुमारे १८ वर्षे एकत्र वैवाहिक जीवन जगल्यानंतर, दोघांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला. धनुष आणि ऐश्वर्या यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना याची माहिती देखील दिली. घटस्फोट असूनही, दोघांमधील संबंध चांगले आहेत. धनुषचा पुढचा चित्रपट ‘कुबेर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.