फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 मीडिया राउंड : टेलिव्हिजनवरचा चर्चित रिऍलिटी शो बिग बॉस १८ने फिनाले वीक मध्ये प्रवेश केला आहे. मागील आठवड्यामध्ये दोन सदस्यांना घराबाहेर काढण्यात आले यामध्ये चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन या दोन्ही महिला सदस्यांना एक आठवडा आधी घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अजूनही घरामध्ये सात स्पर्धक शिल्लक आहेत. यामध्ये रजत दलाल, करणवीर मेहरा, चूम दारंग, इशा सिंग, अविनाश विश्रा, विवियन डीसेना आणि शिल्पा शिरोडकर हे स्पर्धक अजूनही फिनालेच्या शर्यतीमध्ये टिकून राहिले आहेत. फिनालेमध्ये या सीझनमध्ये टॉप सहा खेळाडूंना किंवा टॉप पाच खेळाडूंना फायनल मध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो परंतु या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही.
आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये देशामधील पत्रकार हे घरामध्ये एन्ट्री करणार आहेत आणि यावेळी ते स्पर्धकांना खोचक प्रश्न विचारणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये ज्याप्रकारे स्पर्धकांची जर्नी झालेली आहे त्यावरून पत्रकारांना स्पर्धकांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली आहे.
Bigg Boss 18 : फिनालेपूर्वी अविनाश मिश्रा पुन्हा टॉप ५ च्या शर्यतीत, कोण राहणार फायनलमध्ये टिकून?
प्रदर्शित झालेला प्रोमोमध्ये सर्वात आधी इशा सिंग आणि विवियन डिसेनावर प्रश्नांचा मारा झालेला दिसत आहे. यावेळी एक पत्रकार इशा सिंग यांना म्हणते की तू नेहमीच तुझे कपडे आणि तुझा मेकअप करून मॉडर्न राहण्याचा प्रयत्न करतेस पण तुझे विचार ते खूप जुन्या काळातले आणि खूप खालच्या स्तराचे विचार आहेत. त्यानंतर दुसरा पत्रकाराने विचारले की तुम्हाला आम्ही काय नाव ठेवायचे चुगली आंटी म्हणून नाव ठेवले तर चालेल का? यावर आता ईशा सिंगचे काय उत्तर असणार आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल.
Tomorrow Promo: Media Press Conference
Media called Eisha a Chugli Auntypic.twitter.com/QBHGmvLT6z
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 12, 2025
इशा सिंग नंतर मीडिया विवियन डिसेनावर प्रश्नांचा मारा करताना दिसणार आहे. संपूर्ण सीजनमध्ये विवियन डिसेनाला सांगितले की तू बरेच काही शोमध्ये देऊ शकला नाहीस फार काही करू शकला नाहीस त्याला बऱ्याच जणांनी शोमध्ये येऊन सुद्धा सांगितले पण त्याच्यामध्ये फार काही बदल दिसले नाही. या संदर्भात मीडियाने प्रश्न विविएनला विचारले आहेत. एका पत्रकाराने विवियनला विचारले की जेव्हा विवियन शोमध्ये आला होता तेव्हा शोमध्ये खूप मोठा धमाका करणार असं सर्वांना वाटले होते परंतु ते तसे झाले नाही. तुला वाटतं का तू अशा प्रकारे शोध जिंकू शकतो? यावर विवियन म्हणतो की, मला जे बरोबर वाटले तेच मी केले आहे.
दुसऱ्या पत्रकारांनी त्याला विचारले की, तू घरातला लाडला आहेस यावर विवियन म्हणतो की तू घरातला लाडला आहे यावर विवियन म्हणतो की, मी तुझा लाडला आहे का? पत्रकाराने ठोस शब्दात उत्तर दिले आणि म्हणाले की नाही बनू शकलास तू. तुला तुझ्यासाठी उभे राहता येत नाही आणि जिथे तुला उभे राहायचे होते तिथे तू उभा राहिलेला नाही त्यामुळे जर तू शोचा विजेता झालास तर कशाप्रकारे त्या ट्रॉफीला न्याय देशील?