(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कंगना रणौतचा राजकीय चित्रपट ‘इमर्जन्सी’ बऱ्याच प्रतीक्षेनंतर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. राजकीय वळणांमुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळू शकते. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल काही अंदाज बांधले जात आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे का नाही हे आपण आता जाणून घेणार आहोत. याचदरम्यान हा चित्रपट पहिल्याच दिवशी काय कमाई करतो पाहुयात.
२५ कोटींमध्ये बनवला ‘इमर्जन्सी’ चित्रपट
४५० कोटी रुपये खर्चून बनलेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट आज, प्रत्यक्ष ‘इमर्जन्सी’च्या ५० वर्षांनंतर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे. आज रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सुरुवात ॲडव्हान्स बुकिंगच्या आधारे होणार आहे. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमाई केली आहे हे जाणून घेऊयात.
कंगनाचा चित्रपट एवढी कमाई करू शकतो
कंगना रणौतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करू शकतो. हा चित्रपट पहिल्या दिवशी ३-४ कोटी रुपये कमाई करेल अशी अपेक्षा आहे. जर चित्रपटाने खरोखरच इतके कोटी कमावले तर या चित्रपटामुळे कंगनाला फायदा होऊ शकतो. याआधी कंगनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करण्यात यशस्वी झाले आहेत. या चित्रपट काय धमाका करतो हे पाहणे उत्कंठाचे आहे.
असा आहे गेल्या पाच चित्रपटांचा विक्रम
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.२० कोटी रुपये कमावले. याशिवाय ‘धाकड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ लाख रुपये कमावले होते. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या कंगना रणौतच्या ‘थलाइवी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३२ लाख रुपये कमावले. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पंगा’ चित्रपटाने २.७० कोटी रुपये कमावले. ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाने भारतात ₹४६.१ कोटींची कमाई केली होती. असे अभिनेत्रीचे अनेक चित्रपटांनी सिनेमागृहात जादू केली आहे.
चित्रपटात दिसतील हे स्टार्स
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट कंगना रणौत दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात कंगना स्वतः इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुपम खेर, श्रेयस तळपदे हे जेपी नारायण आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सतीश कौशिक जगजीवन रामच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात चांगली कमाई करण्याच्या मार्गावर आहे.