(फोटो सौजन्य - अकाउंट)
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानंतर, चित्रपटसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सिनेमासृष्टीत पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मंगळवार, ८ एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम अख्तर यांच्या आधी मनोज कुमार यांनीही कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ४ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. आणि आता सलीम अख्तर यांनी देखील ८ एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
चित्रपट निर्माते सलीम अख्तर कोण होते?
सलीम अख्तर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ चित्रपट निर्माते होते, ज्यांनी त्यांच्या आफताब पिक्चर्सच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘कयामत’, ‘लोहा’, ‘चोरोन की बारात’, ‘बटवारा’, ‘बदल’, ‘बाजी’ आणि ‘इज्जत’ सारखे अनेक चित्रपट तयार केले. १९९७ मध्ये ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटाद्वारे सलीम अख्तर यांनी राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत लाँच केले. राणीशिवाय त्यांनी तमन्ना भाटियालाही इंडस्ट्रीत लाँच केले. या चित्रपटाचे नाव ‘चंदा सा रोशन चेहरा’ होते.
सलीम अख्तर व्हेंटिलेटरवर होते
टाईम्स नावच्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांची प्रकृती गेल्या काही काळापासून ठीक नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंजणाऱ्या सलीम अख्तरने अखेर जीवनाला हार मानली आणि या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या बातमीने आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
‘भूमी म्हणजे सौंदर्याची हमी’ फॅशन Queen भूमी पेडणेकरचा हटके अंदाज
सलीम अख्तर यांचे अंत्यसंस्कार कधी होणार?
चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे लग्न शमा अख्तरशी झाले होते. ते स्वभावाने खूप साधे आणि प्रेमळ होते. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज, बुधवार, ९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता जोहरच्या नमाजानंतर होणार आहे. त्यांना इर्ला मशिदीजवळील कब्रस्तानात दफन केले जाणार आहे.