(फोटो सौजन्य - x अकाउंट)
पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘सनम तेरी कसम’ सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला चालला नाही, परंतु जेव्हा तो पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. आणि चाहत्यांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम देखील दिले. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी करत आहेत. पण भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हर्षवर्धन राणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर पूर्वीची स्टारकास्ट पुन्हा या चित्रपटामध्ये असेल तर अभिनेता या चित्रपटाचा भाग होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
‘मावरा होकेन असेल तर मी ‘सनम तेरी कसम २’ करणार नाही’ – हर्षवर्धन
हर्षवर्धनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल मी आभारी आहे, पण आजची परिस्थिती पाहता आणि माझ्या देशाबद्दलच्या काही टिप्पण्या वाचल्यानंतर, मी ठरवले आहे की सनम तेरी कसम’च्या सीक्वलमध्ये जर तेच कलाकार पुन्हा चित्रपटाचा भाग असतील तर मी या चित्रपटामध्ये काम करणार नाही.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरवरून भारतावर टीका करणाऱ्या मावरा होकेनच्या पोस्टला उत्तर म्हणून हे विधान आले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यानंतर, काही पाकिस्तानी कलाकारांनी भारताच्या कृतीला “कायर हल्ला” म्हटले. मावराने X वर असेही लिहिले आहे की, “मी भारताने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करते… अनेक निष्पाप लोक मारले गेले आहेत… अल्लाह आपल्या सर्वांचे रक्षण करो… आणि सर्वांना समज देवो… या अल्लाह हो या हाफिजो.” असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर २२ दिवसांनी बिग बींनी सोडले मौन; नेटकरी थक्क, म्हणाले- ‘दबावात येऊन लिहिले…’
Strongly condemn India’s cowardly attack on Pakistan..
Innocent civilians have lost their lives..May Allah protect us all.. may sense prevail..
Ya Allah ho Ya Hafizo.. #PakistanZindabad
— MAWRA (@MawraHocane) May 6, 2025
हर्षवर्धनची पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर व्हायरल झाली, जिथे लोकांनी त्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “एकतेत ताकद आहे. या निर्णयात आदर आहे.” दुसऱ्याने लिहिले, “राणे, तू सर्वोत्तम आहेस. ‘सनम तेरी कसम’ तुझ्या अभिनय आणि संगीतामुळे हिट झाला आहे, बाकीच्या कलाकारांना कोणतीही महत्त्वाची भूमिका नव्हती.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “किती धाडसी माणूस! याचा अभिमान आहे!”, असे लिहून अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर नावाची लष्करी मोहीम सुरू केली. हा हल्ला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. भारतीय सैन्याने ९ ठिकाणी २४ अचूक हल्ले केले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला आहे.
‘Bhool Chuk Maaf’ सिनेमागृहानंतर आता ओटीटीवर अडकला, मुंबई उच्च न्यायालयाची चित्रपटाला स्थगिती
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाबद्दल
हा एक रोमँटिक चित्रपट होता जो राधिका राव आणि विनय सप्रू यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. त्याची निर्मिती दीपक मुकुट यांनी केली आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेने यांचा हा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात अनुराग सिन्हा, मनीष चौधरी, मुरली शर्मा आणि सुदेश बेरी हे देखील होते. सुरुवातीला हा चित्रपट चांगला चालला नाही, पण फेब्रुवारीमध्ये तो पुन्हा चित्रपटगृहात री-रिलीज करण्यात आला. तेव्हा या चित्रपटाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. फक्त दोन दिवसांतच चित्रपटाने आधीपेक्षा जास्त कमाई केली. हा सर्वाधिक कमाई करणारा री-रिलीज चित्रपट ठरला आणि त्याने ₹५३ कोटींची कमाई केली, त्यापैकी ₹४५ कोटी फक्त री-रिलीजमधून मिळाले.