(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांचा आखिरी सवाल हा चित्रपट सध्या 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाची झलक पाहता तो सत्य घटनांवर आधारित असल्याचे दिसते आणि भारताच्या इतिहासातील काही वादग्रस्त मुद्द्यांना स्पर्श करताना दिसतो. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर घालण्यात आलेल्या बंदीपासून ते बाबरी मशीद पाड प्रकरण यांसारख्या संवेदनशील घटनांचा उल्लेख यात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता इतिहासातील काही महत्त्वाच्या आणि कमी चर्चेत असलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत निर्मात्यांनी एक दमदार टीझर सादर केला आहे, जो चित्रपटाच्या कथेबाबत अधिक रहस्य निर्माण करतो. याची सुरुवात एका अशा प्रश्नाने होते, जो विचारण्याचे धाडस फार कमी लोकांनी केले आहे: 1934 साली RSS चे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्यात झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीत नेमकी काय चर्चा झाली होती?
टीझरमध्ये त्यांच्या भेटीची आणि संभाषणाची प्रभावी झलक दाखवण्यात आली आहे, जी अत्यंत नाट्यमय पद्धतीने सादर करण्यात आली आहे. त्याचा अंदाज स्पष्ट आणि थेट आहे, ज्यामुळे असे वाटते की हा चित्रपट इतिहासातील अजून न उलगडलेल्या पानांना उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा चित्रपट केवळ RSS च्या विचारसरणीवर भाष्य करत नाही, तर त्यापलीकडे जाऊन काही धाडसी प्रश्न उपस्थित करतो, जे प्रेक्षकांना देशाच्या वाटचालीला आकार देणाऱ्या घटनांबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतील.
View this post on Instagram
A post shared by Nikhil Nanda Motion Pictures (@nikhilnanda_motionpictures)
Bigg Boss Marathi 6 : धक्कदायक! ‘या’ सदस्याला घ्यावा लागला घराचा निरोप… Season 6 चं शेवटचं Eviction
निखिल नंदा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट निखिल नंदा यांनी सादर केला असून त्याचे दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. ‘आखिरी सवाल’ चे निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त आहेत, तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांनी सह-निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. संगीत मोंटी शर्मा यांनी दिले असून गीतकार कुमार विश्वास आहेत. ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






