(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सोनी लिव्हवरील आगामी सिरीज ‘रात जवां है’ मध्ये बरूण सोबती अविनाशची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका त्याला वडिलांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते. ११ ऑक्टोबर रोजी प्रीमियर होणारा हा कॉमेडी-ड्रामा तीन मित्र राधिका (अंजली आनंद यांनी साकारलेली भूमिका), अविनाश (बरूण सोबती यांनी साकारलेली भूमिका) आणि सुमन (प्रिया बापट यांनी साकारलेली भूमिका) यांच्या प्रवासाला सादर करते, जेथे ते त्यांचे वैयक्तिक जीवन आणि नात्यांमधील जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबत पालकत्वाची जबाबदारी पार पडताना दिसणार आहे.
या सिरीजच्या कथानकाने पाडलेल्या प्रभावाबाबत सांगताना बरूण सोबती म्हणाले, “मी त्वरित भूमिकेशी संलग्न झालो. मला ही भूमिका माझी स्वत:ची असल्यासारखे वाटले, तसेच मी माझी स्वत:ची गाथा वाचत आहे असे मला वाटू लागले. अविनाशचा प्रवास उत्साहपूर्ण गोंधळ आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला पाहायला मिळणार आहे, ज्यामधून वडिल म्हणून माझ्या स्वत:च्या जबाबदारीची जाणीव झाली. जबाबदाऱ्या आणि पालकत्वाचे संषर्घ यामधील संतुलनाने कथानकाला आपलेसे केले. आजच्या युगात पालक असण्याच्या वास्तविकतेला इतक्या अचूकपणे सादर करणारे कथानक पाहायला मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. अविनाशची असुरक्षितता आणि जबाबदाऱ्या यांदरम्यान सतत धावपळ, अधिक त्रस्त झाल्यामुळे विस्कळीत झालेले शांततेचे क्षण माझ्या स्वत:च्या जीवनातील असल्यासारखे वाटू लागले. या भूमिकेमधून मला अभिनय साकारताना माझ्या वैयक्तिक जीवनाला अनुभवता आले, ज्यामुळे हा संस्मरणीय प्रवास ठरला आहे.” असे अभिनेत्याने सांगितले.
हे देखील वाचा- सोनाली कुलकर्णीने ‘मानवत मर्डर्स’ मधील भूमिकेबद्दल व्यक्त केले मत, म्हणाली “मोठी जबाबदारी मिळाली”
यामिनी पिक्चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित या सिरीजचे लेखन आणि निर्मिती ख्याती आनंद – पुथरन यांनी केले आहे आणि अत्यंत प्रतिभावान सुमीत व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्ये प्रतिभावान स्टार कलाकार आहेत. फक्त आठ एपिसोड्स असलेली ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्यामध्ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण आणि हृदयस्पर्शी सीनचा समावेश आहे. पालकत्व आणि मैत्रीच्या चढ-उतारासह रोमांचक राइडचा आनंद ही सिरीज तुम्हाला देणार आहे. ‘रात जवां है’ ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.