(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये सध्या वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याआधी चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर वरुण आणि जान्हवीने मुंबईतील एका गरबा इव्हेंटमध्ये हजेरी लावली आणि प्रेक्षकांनाही थिरकायला लावलं. विशेष म्हणजे त्यांनी दादा कोंडके यांचं अजरामर गाणं ‘ढगाला लागली कळ’ यावर धमाल डान्स करत प्रेक्षकांची मनं जिंकली. पावसामध्ये हे दोघं डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत ते दोघे मुंबईतील एका नवरात्री उत्सवात सामील झाले होते. तिथे त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट सनी संस्कारी की तुलसी कुमारी चे प्रमोशन केलं. यावेळी वरूणने ऑफव्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर जान्हवीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
चित्रपटात वरुण-जान्हवीसोबतच रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा ही लोकप्रिय जोडी देखील एका वेगळ्या अवतारात झळकणार आहे. चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवणाऱ्या या प्रमोशनल इव्हेंट्समुळे ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’कडून मोठ्या हिटची अपेक्षा केली जात आहे.
दसऱ्याला बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये थेट टक्कर पाहायला मिळणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स अंतर्गत तयार झालेला ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ आणि ऋषभ शेट्टी दिग्दर्शित व लिखित ‘कांतारा: चॅप्टर १’ हे दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी – २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहेत.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर ही प्रमुख जोडी झळकते. त्यांच्या जोडीला सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आणि अभिनव शर्मा हे सहकलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
चित्रपट प्रेम, कौटुंबिक मूल्यं आणि हलक्याफुलक्या विनोदाने भरलेला एक संपूर्ण फॅमिली एंटरटेनर असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, ‘कांतारा: चॅप्टर १’ हा एक पौराणिक आणि गूढ कथानक असलेला प्रीक्वेल आहे, जो ‘कांतारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या आधीच्या घटनांवर आधारित आहे.
सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज
या दोन्ही चित्रपटांची एकाच दिवशी रिलीजमुळे बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकीकडे पारंपरिक हिंदी प्रेक्षकांसाठी साजेसा रोमँटिक ड्रामा, तर दुसरीकडे पौराणिकतेची गूढ सादरीकरण करणारा चित्रपट, यामधून प्रेक्षक कोणता चित्रपट निवडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.