(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी ती चर्चेत आली तिच्या लूकमुळे. जान्हवीनं आपल्या आई, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी घातलेली एक जुनी, पारंपरिक साडी घालून ‘होमबाउंड’ या शॉर्ट फिल्मच्या खास स्क्रीनिंगला उपस्थिती लावली. ही साडी एक काळात श्रीदेवी यांनी अनेकदा परिधान केली होती आणि ती चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. जान्हवीने हीच साडी घालून त्या आठवणींना उजाळा दिला. तिच्या या खास लुकमुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.
जान्हवीच्या या लुकची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिच्या लुकचं भरभरून कौतुक केलं जात आहे. ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केली होती आणि श्रीदेवींनी ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या रिसेप्शनमध्ये परिधान केली होती. जाह्नवीला ही साडी नेसलेले पाहून अनेकांना श्रीदेवींची आठवण झाली.
जान्हवी कपूर सध्या तिच्या होमबाउंड चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवीचा हा सिनेमा२६ सप्टेंबरला संपर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. नुकतचं ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. २०२६ च्या अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटेगरीमध्ये भारताकडून ‘होमबाउंड’ हा हिंदी चित्रपट पाठवण्यात आला आहे. यामध्ये इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो
या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग साठी अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आईची साडी नेसून या सोहळ्याला पोहोचली होती. जान्हवीला या कार्यक्रमातील पाहुण्यांनी ”तू खूपच सुंदर दिसतेस” अशी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केलं. यावर जान्हवीने सांगितलं, ”ही माझ्या आईची साडी आहे”. ही साडी श्रीदेवी यांनी ८ वर्षींपूर्वी नेसली होती.
‘होमबाउंड’च्या स्क्रीनिंगसाठी जाह्नवी कपूरने केवळ आपल्या आई श्रीदेवी यांची आयकॉनिक साडी नेसूनच नाही, तर एक भावनिक आणि खास भारतीय परंपरा जपली. तिच्या हातात दिसणारा काळा धागा विशेष लक्ष वेधून गेला. भारतात अनेक आई आपल्या मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या हातात किंवा पायात हा काळा धागा बांधतात.हे पहिल्यांदाच नाही, तर जाह्नवीच्या हातात पूर्वीही अनेक वेळा हा काळा धागा दिसला आहे, ज्यावरून तिचं परंपरेशी नातं आणि आध्यात्मिक श्रद्धा स्पष्ट होते.