फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : बिग बॉस १८ च्या फिनालेला आता फक्त २ आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घरातले सदस्य फिनालेमध्ये जाण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. यामध्ये सोशल मीडियावर या स्पर्धकांबद्दल आणि शोबद्दल मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. शोमध्ये असल्यापासून सोशल मीडियावर त्याचबरोबर देशामध्ये स्पर्धकांच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. जसजसा फिनाले जवळ येत आहे शोमधील आणि स्पर्धकांमधून तीव्रता आणखीनच वाढली आहे. सध्या, कशिश कपूरला घरातून बाहेर काढण्यात आले आहे आणि वृत्त आहे की आणखी एक इव्हिक्शन केले जाणार आहे ज्यानंतर टॉप ८ स्पर्धक मिळणार आहेत.
ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सर्वात जास्त कोणत्या स्पर्धकाचा हॅशटॅग सर्वाधिक वापरला गेला आहे, याची यादीही समोर आली आहे. ट्विटरवर ट्रेंड करत असलेल्या टॉप 5 स्पर्धकांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ट्विटरवरील ट्रेंडिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर, करणवीर मेहराने इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आहे. करणवीर मेहराचा हॅशटॅग १.१ मिलियन वेळा वापरला गेला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की सर्वाधिक लोकप्रिय हॅशटॅग फक्त करणवीर मेहराचा आहे. सोशल मीडियावर त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे.
Bigg Boss 18 : सलमान-कामिया पंजाबीने विवियन डिसेनाच्या खेळावर केले प्रश्न उपस्थित
करणवीर मेहरानंतर ट्विटरवर सर्वाधिक हॅशटॅग वापरण्याच्या बाबतीत विवियन डिसेनाचे नाव समोर येत आहे. 880.7K लोकांनी विवियनबद्दल हॅशटॅग वापरला आहे. या मोसमातील ट्रॉफी जिंकण्यासाठी विवियनही प्रबळ दावेदार मानला जात होता पण त्याने फार काही शोमध्ये केले नाही त्यामुळे त्याचे चाहतेही निराश आहेत. विवियननंतर अविनाश मिश्रा यांचं नाव या यादीत दिसत आहे. रजत दलाल यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत ट्विटरवरही अविनाशचे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. अविनाशबद्दल 383.6K हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. या प्रकरणात रजत दलाल आणि चाहत पांडे यांचीही नावे टॉप 5 च्या यादीत येत आहेत. रजत दलालचे 303K हॅशटॅग वापरले गेले आहेत तर चाहत पांडेचे 298.2K हॅशटॅग आतापर्यंत वापरले गेले आहेत.
Most Talked #BB18 Contents on Twitter (X) :
HASHTAG :
🥇#KaranveerMehra – 1.1M
🥈#VivianDSena – 880.7K
🥉#AvinashMishra – 383.6K
⭐️#RajatDalal – 303K
⭐️#ChahatPandey – 298.2KComment – Your Fav #BiggBoss #BiggBoss18 @KaranVeerMehra
Follow – @TheKhabriTak for more pic.twitter.com/FUOK3NUxqo
— The Khabri Tak (@TheKhabriTak) January 3, 2025
सोशल मीडियावर विकेंडच्या वॉरचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे, यामध्ये सलमान खान आणि कामिया पंजाबी विवियन डिसेनाची शाळा घेताना दिसणार आहे. त्याला या शोमध्ये कमी योगदान दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. जेव्हा या शोची सुरुवात झाली तेव्हा विवियन डिसेना हे टेलिव्हिजनवरचे सर्वात मोठ्या नावांमध्ये त्याचा समावेश होतो पण तो फार काही शोमध्ये करू शकला नाही.