(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने गोव्यात एका खासगी समारंभात अँटोनी थाटीलसोबत लग्न केले आहे. कीर्तीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत आणि तिच्या मनातील भावनाही लिहिल्या आहेत. चाहत्यांना हे फोटो पाहून आनंद झाला आहे. अभिनेत्रीला आणि तिच्या जोडीदाराला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच हे फोटो पाहून या याचीच चर्चा सुरु आहे.
साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो सोसिअल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कीर्ती साउथ ब्राइडल गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी कीर्ती आणि अँटोनी दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होते. कीर्तीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, ‘नायकीच्या प्रेमासाठी.’ हे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. आणि दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
Selena Gomez: सेलेना गोमेझची झाली एंगेजमेंट; बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोने घातली अंगठी, फोटो झाले व्हायरल!
या फोटोंमध्ये कीर्ती सुरेश आणि अँटोनी थाटील किती आनंदी दिसत आहेत हे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. अँटोनीने कीर्तीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताच नववधूच्या डोळ्यात पाणी आले आणि ती अँथनीकडे पाहतच राहिली. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आहे. या फोटोमध्ये कीर्ती आणि अँथनी हसताना दिसत आहेत आणि नायकीसोबत खेळतानाही दिसत आहेत. अभिनेत्रीच्या कुत्र्याचे नाव नायकी आहे. या फोटोमध्ये या दोघांची बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर साऊथ अभिनेत्री कीर्ती बेबी जॉन या चित्रपटात दिसणार आहे. कीर्ती सुरेशशिवाय वरुण धवन, जरा जायना, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. बेबी जॉन हा ॲटलीच्या 2016 मधील तमिळ चित्रपट थेरीचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कलीज यांनी केले आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.