फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ टॉप १० स्पर्धकांची रँकिंग : रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस १८ चा प्रवास फिनालेच्या दिशेने जात आहे. ग्रँड फिनालेसाठी सर्व खेळाडू त्यांचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. कोणते खेळाडू प्रवास फिनालेमध्ये जाणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. करणवीर मेहरा, विवियन डिसेना, रजत दलाला, चुम दारंग, चाहत पांडे, अविनाश मिश्रा, कशिश कपूर, ईशा सिंग, श्रुतिका अर्जुन आणि शिल्पा शिरोडकर यांना टॉप १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे. पण कोणते खेळाडू टॉप 3 मध्ये पोहोचू शकले हा प्रश्न आहे.
Bigg Boss 18 : गुगलवर या बिग बॉसच्या स्पर्धकाला मागील सात दिवसात केले सर्वाधिक सर्च!
बिग बॉसशी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या बिग बॉस खबरी या प्लॅटफॉर्मने पोस्ट केले आहे की करणवीर मेहरा सर्वाधिक रेटिंगसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. विवियन डिसेना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तर रजत दलाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. चुम दारंग या यादीत चौथ्या स्थानावर आहे, पण महिला खेळाडूंच्या बाबतीत ती अव्वल स्थानावर आहे. या यादीत चाहत पांडे पाचव्या स्थानावर आहे. अविनाश मिश्रा सहाव्या तर कशिश कपूर सातव्या क्रमांकावर आहेत. इशा सिंग आठव्या क्रमांकावर आहे.
या यादीत श्रुतिका सिंग आणि शिल्पा शिरोडकर अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. ऑरमॅक्स मीडियाच्या यादीत रजत दलाल पहिल्या क्रमांकावर आणि विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर करणवीर मेहरा आणि शिल्पा शिरोडकर यांना तिसरे आणि चौथे स्थान मिळाले आहे. सलमान खान होस्ट केलेल्या रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस १८ च्या या सीझनमध्ये विशेष टीआरपी आणत नाही, म्हणूनच अशी बातमी आहे की यावेळी निर्माते शो वाढवणार नाहीत. बहुतेक सीझनमध्ये, निर्माते प्रत्येक वेळी टीआरपी लक्षात घेऊन सीझन वाढवतात.
Ranking Results of Week 12
⭐ #KaranVeerMehra 2898
⭐ #VivianDsena 2157
⭐ #RajatDalal 1582
⭐ #ChumDarang 1229
⭐ #ChahatPandey 1210
⭐ #AvinashMishra 818
⭐ #KashishKapoor 622
⭐ #EishaSingh 446
⭐ #ShrutikaArjun 410
⭐ #ShilpaShirodkar 95— Khabri 👂 (@real_khabri_1) December 30, 2024