(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कृती सेननची बहीण, नुपूर सेनन, गायक स्टेबिन बेनशी लग्न करणार आहे. नुपूरने इन्स्टाग्रामवर स्टेबिनला दिलेल्या तिच्या रोमँटिक प्रपोजलचे सुंदर फोटो शेअर करत ही बातमी शेअर केली. स्टेबिनने सुट्टीच्या वेळी तिला एका यॉटवर प्रपोज केले. एका फोटोमध्ये, तो एका गुडघ्यावर बसून नुपूरला प्रपोज करताना दिसत आहे, तर काही जण हातात “तू माझ्याशी लग्न करशील का?” असे लिहिलेले पोस्टर धरलेले दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये, नुपूर तिची मोठी हिऱ्याची अंगठी दाखवत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये नुपूर सेनन आणि स्टेबिन बेन एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. कृती सॅननने हा प्रस्ताव पाहिला. एका फोटोमध्ये, ती देखील स्टेबिन बेनला मिठी मारताना दिसत आहे, जरी तिचा चेहरा दिसत नाही.या सगळ्यात, जानेवारीमध्ये ते लग्न करू शकतात अशा अफवा पसरत आहेत. वृत्तानुसार, हे जोडपे ११ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करू शकते. दोघांपैकी कोणीही अद्याप काहीही माहिती दिली नाहीये.
फोटो शेअर करताना नुपूर सॅननने लिहिले, “शक्यतेने भरलेल्या जगात, मला ‘हो’ म्हणण्याची सर्वात सोपी संधी मिळाली.” पोस्ट व्हायरल होत असून या दोघांना चाहते अभिनंदानाच्या कमेंट्स करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या दोघांना अभिनंदन केले आहे. प्रियंका चहर चौधरी, अभिषेक बजाज, करण टॅकर आणि इतर अनेकांनी त्यांचे प्रेम आणि शुभेच्छा पाठवल्या आहेत.
नुपूर सेननआणि स्टेबिन बेन यांचे लग्न समारंभ कधी?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, नुपूर सेनन आणि स्टेबिन बेन यांचे लग्न समारंभ ९ ते ११ जानेवारी दरम्यान होईल, तर मुख्य समारंभ ११ जानेवारी रोजी होणार आहे. वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, “पूर्वी जाहीर केलेल्या तारखा चुकीच्या होत्या. कुटुंबांनी ११ जानेवारीसाठी लग्नाची तारीख निश्चित केली आहे आणि हे समारंभ तीन दिवस चालतील.”
सूत्राने पुढे म्हटले आहे की, लग्न समारंभ उदयपूरमध्ये होणार असले तरी, १३ जानेवारी रोजी मुंबईत एक वेगळे रिसेप्शन आयोजित करण्याची त्यांची योजना आहे, ज्यामध्ये त्यांचे सहकारी आणि उद्योगातील मित्र उपस्थित राहतील.






