(फोटो सौजन्य - अकाउंट)
ओटीटीवर चित्रपट पाहण्याचीही वेगळीच मजा आहे. आता नुकताच प्रदर्शित झालेला आणखी एक चित्रपट ओटीटीवर दणका देण्यास सज्ज आहे. लुसिफरचा सिक्वेल ‘L2: Empuraan’ आता OTT वर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवल्यानंतर, आता लोक घरी बसून ‘L2: Empuraan’ चा आनंद घेऊ शकतील. ‘L2: Empuraan’ कधी आणि कुठे प्रसारित होणार हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलीच कमाई केली आहे. आणि निर्मात्यांना खुश करून टाकले आहे.
‘L2: एम्पूरान’ कधी आणि कुठे प्रसारित होईल?
थिएटरमध्ये भरपूर कमाई करणारा मोहनलालचा ‘L2: Empuraan’ हा चित्रपट आता OTT वर येत आहे. हो, ‘L2: Empuraan’ २४ एप्रिल २०२५ पासून Jio Hotstar वर स्ट्रीम होणार आहे. मोहनलालने स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे. खरंतर, मोहनलालने त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली.
Kesari 2: अक्षय कुमारने चाहत्यांना केले भावुक, ‘केसरी २’ बद्दल काय म्हणाला ‘खिलाडी’?
मोहनलालने शेअर केली पोस्ट
या पोस्टमध्ये, मोहनलालने चित्रपटाची एक अद्भुत पोस्ट शेअर केली आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की ‘L2: Empuraan’ २४ एप्रिलपासून फक्त Jio Hotstar वर स्ट्रीम होणार आहे. ही पोस्ट येताच लोकांचे चेहरे आनंदाने उजळले. या पोस्टवर युजर्सनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने या पोस्टवर लिहिले की, ‘अखेर आता हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.’ अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त करून कंमेंटचा वर्षाव केला आहे.
L2: Empuraan will be streaming from 24 April only on JioHotstar. #Empuraan #JioHotstar #EmpuraanOnJioHotstar #PrithvirajSukumaran #MalayalamCinema #Mollywood #EmpuraanMovie #Lucifer2 #EmpuraanL2 #L2E pic.twitter.com/ABTh6suEnZ — Mohanlal (@Mohanlal) April 17, 2025
लोक आतुरतेने वाट पाहत आहेत
तसेच पुढे तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, ‘अखेर प्रतीक्षा संपली’. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘मी आतुरतेने वाट पाहत आहे.’ एकाने सांगितले की खूप मजा येणार आहे’. या पोस्टवर लोकांनी अशा कमेंट्स केल्या आहेत. दुसरीकडे, जर आपण मोहनलालच्या ‘एल२: एम्पूरान’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर तो एक अॅक्शन पॅक्ड पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे, जो आता घरी बसून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
हातात झाडू अन् कमरेला खोचलेली साडी, राधिकाचा नव्या चित्रपटातला हटके लुक रिलीज
चित्रपटाची स्टारकास्ट
या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात अमेरिकन लोकांचे कॅमिओ देखील पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अभिमन्यू सिंह, पृथ्वीराज सुकुमारन, गेम ऑफ थ्रोन्स फेम जेरोम फ्लिन, मंजू वॉरियर, इंद्रजीत सुकुमारन आणि टोविनो थॉमस यांनी मोहनलालच्या ‘L2: Empuraan’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात अमेरिकन अभिनेता रिक युन आणि प्रणव मोहनलाल यांचा कॅमिओ देखील अद्भुत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात खूपच आवडला आहे.