(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय यांचा ‘मस्ती ४’ हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे आणि त्याची टक्कर ‘१२० बहादूर’ या चित्रपटाशी होत आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचा अर्थ चौथा भाग नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आणि चाहते चित्रपटात तितका रस दाखवत नसल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनवरून हे लक्षात येते की चित्रपट चाहत्यांना फार आवडला नाही आहे. दोन दशकांत या चित्रपट फ्रँचायझीचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत. असे नाही की या फ्रँचायझीने लक्षणीय कमाई केली नाही. परंतु, यावेळी हा चित्रपट पूर्णपणे डिस्कनेक्ट झालेला दिसतो आहे.
मस्ती ४ मध्ये, पुरुष कलाकारांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कलाकार पहिल्या भागात होते तसेच आहेत. परंतु, या चित्रपटाने मागील चित्रपटांइतके कलेक्शन केलेले नाही. दोन दिवसांत चित्रपटाने किती कमाई केली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच चित्रपट प्रेक्षकांना किती पसंत आला हे चित्रपटाच्या कमाई वरून समजणार आहे.
मस्ती ४ ने दोन दिवसांत केली एवढीच कमाई?
मस्ती ४ बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने पहिल्या दिवशी २.७५ कोटी रुपये कमावले आहे. तर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही तशीच कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत कोणतीही वाढ किंवा घट झालेली दिसली नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने २.७५ कोटी रुपये कमावले आहे. भारतात त्याचे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन ५.५० कोटी रुपये झाले आहे. रविवारी प्रेक्षकांना नक्कीच जास्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आता हा चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे बाकी आहे.
एक्सला दिली दुसरी संधी, Ranbir Kapoor सोबत रोमान्स करणार Deepika Padukone? फॅन्समध्ये खळबळ
चित्रपटाच्या बजेटबद्दल सांगायचे झाले तर, अहवालात असे म्हटले आहे की ते ५० कोटी रुपये होते. त्या तुलनेत, चित्रपटाने दोन दिवसांत ५.५ कोटी रुपये कमावले आहेत. आगामी चित्रपटांमध्ये चित्रपट कसा आपला वेग कायम ठेवतो आणि टिकून राहतो हे पाहणे बाकी आहे.






