(फोटो सौजन्य-Social Media)
प्रख्यात अभिनेते सुमीत व्यास सिरीज ‘रात जवां है’सह दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ही सिरीज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे. सुमीत यांनी या सिरीजमधील कथानकामध्ये नवीन आणि लक्षवेधक दृष्टीकोन आणला आहे, जो तीन मित्रांच्या सर्वोत्तम, विनोदी आणि संबंधित अनुभवांना सादर करतो, जेथे हे तीन मित्र पालकत्वाच्या धमाल आणि गोंधळपूर्ण गुंतागूंतींमधून जातात. ते म्हणाले की, त्यांनी दिग्दर्शनाप्रती सौम्य व संवेदनशील दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे. त्यांचा दृढ विश्वास आहे की, उत्स्फूर्तता उत्तमरित्या काम करते. त्यांचा कथानकाला उत्साहित करणारे आनंददायी, वास्तविक क्षण कॅप्चर करण्याचा मनसुबा या सिरीजमध्ये दिसणार आहे.
दिग्दर्शक म्हणून पदार्पणाबाबत सुमीत व्यास म्हणाले, ”मला कलाकरांना जबरदस्तीने सीन्स करायला लावणे आवडत नाही. मी त्याप्रती विचारशील आणि सर्वोत्तम दृष्टीकोनाचा अवलंब करतो आणि प्रत्येक कलाकाराच्या अद्वितीय क्षमतांवर लक्ष केंद्रित करतो. मी अनेकवेळा रिटेक घेणे टाळतो, ज्याद्वारे उत्स्फूर्ततेच्या माध्यमातून वास्तविक क्षणांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. सेटवर, मी शिस्तबद्धतेला प्राधान्य देतो, शांतमय वातावरणाची खात्री घेतो, ज्यामुळे कलाकारांना शांतपणे प्रोजेक्टबाबत विचार करता येईल, प्रयोग करण्यास वेळ मिळतो आणि सुरक्षित असल्यासारखे वाटते. मी आशा करतो की, या सिरीजच्या कलाकारांसोबत मी केलेल्या धमालीप्रमाणे त्यांना देखील माझ्यासोबत काम करायला आवडले असेल.” असे त्यांनी सांगतले.
तसेच, ते पुढे म्हणाले, ”काहीतरी भावूक व सर्वोत्तम गोष्टींना एक्स्प्लोअर करण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता, जे मी केलेल्या किंवा भाग असलेल्या प्रखर कथानकांपेक्षा वेगळे होते. मी आशा करतो की, पालकत्वावरील हे हलके-फुलके कथानक त्याचे चित्रीकरण करताना आम्ही केलेल्या धमालीप्रमाणे प्रेक्षकांना देखील आवडेल.” असे दिग्दर्शकाने सांगितले.
हे देखील वाचा- आशा भोसले यांच्या नावाने सुरू आहे सोशल मीडियावर बनावट हँडल, टीमने चाहत्यांना केले अलर्ट!
यामिनी पिक्चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित या सिरीजचे लेखन आणि निर्मिती ख्याती आनंद- पुथरन यांनी केले आहे आणि अत्यंत प्रतिभावान सुमीत व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्ये बरूण सोबती, अंजली आनंद आणि प्रिया बापट यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. फक्त आठ एपिसोड्ससह ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्यामध्ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण आणि हृदयस्पर्शी तसेच संबंधित कथानकाचा समावेश यामध्ये आहे.