(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
राजकुमार राव सध्या स्त्री 2 च्या यशाचा आनंद घेत आहेत. हॉरर कॉमेडीने आतापर्यंत 500 कोटींहून अधिक कमाई केली असून येत्या काळात हा चित्रपट लवकरच 600 कोटींचा आकडा गाठेल. अलीकडेच, रावने स्वतःचा स्कर्ट-टॉप घातलेला एक फोटो शेअर केला होता, जो ‘स्त्री 2’ मधील कट केलेला सीन असल्याचे बोलले जात होते. तसेच अभिनेत्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली असून, सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. राजकुमारने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो बंदूक हातात धरून ॲक्शन अवतारात दिसत आहे.
राजकुमार रावने नव्या चित्रपटाची केली घोषणा
वास्तविक, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्टर शेअर केला आहे ज्यामध्ये तो पांढरा पायजमा आणि कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. तो जीपवर बंदूक घेऊन उभा आहे. तो लवकरच मालिक या चित्रपटामध्ये दिसणार आहे. आता नक्की या चित्रपटाची कथा आणि अभिनेत्याची भूमिका अद्यापहीसमोर आली नसून हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोवर लिहिले की, ‘जन्माला आला नाही आलो तर काय, बनू तर शकतो.’ असे असून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “उद्या सांगू. उद्या मोठी घोषणा होणार आहे सोबत रहा!” असे लिहून राजकुमारने ही पोस्ट शेअर केली आहे. आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
‘मालिक’ चित्रपटामध्ये दिसणार अभिनेता
तसेच, अभिनेत्याने आणखी एक पोस्टर शेअर केला असून, ‘मालिक के दुनिया में आपका स्वागत हैं’ असे कॅप्शन लिहून ही पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. तसेच या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे असे देखील अभिनेत्याने सांगितले आहे. आणि लवकरच आपली भेट चित्रपटगृहात होईल असा देखील संदेश राजकुमारने चाहत्यांना दिला आहे.
चाहत्यांना चित्रपटाची लागली उत्सुकता
यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर मोठ्या उत्साहात कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले, ‘राजकुमार राव ॲक्शनमध्ये?’ दुसऱ्याने कमेंट केली- ‘हा चित्रपट खतरनाक असेल’. तिसऱ्याने लिहिले- ‘आता खाली वेळ आली आहे’. असे लिहून चाहत्यांनी आपला उत्साह फोटोवर कंमेंट करून शेअर केला आहे.
हे देखील वाचा- Shiv Thakare : “फ्लावर समझे क्या, फायर है अपुन…” शिव ठाकरेचा खतरनाक लूक पाहिलात का ?
राजकुमार रावच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, अभिनेता लवकरच तृप्ती दिमरीसोबत ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा रेट्रो ड्रामा 11 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय तो अभिषेक जैन दिग्दर्शित सेकंड इनिंग्स या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. असेच धमाकेदार चित्रपट घेऊन अभिनेता चाहत्यांना खुश करणार आहे.