(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या दोन दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये विजयने शेरवानी घातली आहे आणि रश्मिकाने लेहेंगा परिधान केला आहे. नातेवाईक आजूबाजूला जमलेले या फोटोमध्ये दिसत आहे. स्टेजवर, महेश बाबू आणि प्रभास नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देत आहेत. तसेच हा फोटो आता फेक असल्याचे समजले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो AI जनरेट असल्याचे समजले आहे.
परक्या देशात नवऱ्याच्या शोधात निघाली कावेरी; ‘कैरी’ चित्रपटातील सायली संजीवची लक्ष्यवेधी भूमिका
बॅकग्राउंडला “विजय आणि रश्मिका” असे लिहिलेला आणखी एक फोटो आहे. दोघांनीही गळ्यात हार घातले आहेत. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर देखील दिसत आहेत. हा फोटो इतका वास्तववादी दिसतो की चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. परंतु, चाहत्यांचा असा दावा आहे की हे फोटो एआय वापरून तयार केले आहेत, म्हणजेच ते खरे नसून बनावट आहेत. रश्मिका नुकतीच श्रीलंकेला गेली होती. तिच्यासोबत तिची गर्ल गँगही होती. तिने फोटो पोस्ट केले तेव्हा अफवा पसरू लागल्या की तिने तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलरेट पार्टी केली आहे. परंतु, तिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत का?
२९ वर्षीय रश्मिका आणि ३६ वर्षीय विजय अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत, परंतु त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल मौन सोडलेले नाही. आता, अहवालांमध्ये दावा केला जात आहे की ते फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करतील, परंतु अद्याप दोघांनीही याची पुष्टी केलेली नाही.






