(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
‘जोधा अकबर’ मध्ये सलीमची भूमिका साकारणारा टीव्ही अभिनेता रवी भाटिया अलीकडेच एका मोठ्या रस्ते अपघाताचा बळी ठरला. ही घटना १० फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईत घडली, अभिनेता काही कामासाठी अक्सा बीचकडे जात होता. यावेळी या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि अभिनेता जखमी देखील झाला आहे. या अभिनेत्याने त्याच्या दुखापतींचे आणि कारच्या वाईट स्थितीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे पाहून चाहते चकित झाले आहेत. आणि त्याच्या तब्येतीची विचापूस करत आहेत.
अपघाताबद्दल रवी भाटिया काय म्हणाले?
या अपघाताबद्दल बोलताना रवी भाटिया यांनी ई-टाईम्सला सांगितले की, ‘आम्ही अक्सा बीचवर जात असताना आमची कार एका टेम्पोला धडकली. याआधी आमची गाडी दोनदा भिंतीवर आदळली. दुपारी ४:३० च्या सुमारास हा अपघात झाला. तिथे तैनात असलेल्या लष्करी जवानांनी सांगितले की त्या वळणावर वारंवार अपघात होतात. रवी भाटिया म्हणाले की, या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, परंतु त्यांना किरकोळ दुखापत झाली आणि त्यांच्या अंगावर जळण्याच्या खुणा होत्या. तो पुढे म्हणाला, ‘माझ्या जखमा बऱ्या होत आहेत, पण गाडी पूर्णपणे खराब झाली आहे. सुदैवाने काहीही गंभीर घडले नाही. हा अपघात त्यांच्यासाठी डोळे उघडणारा अनुभव होता आणि त्यामुळे त्यांना जीवन किती नाजूक आणि अनिश्चित असू शकते हे समजले.’ असे ते म्हणाले आहेत.
रवी भाटिया यांनी सांगितली ती गोष्ट
रवी भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांनी ताबडतोब त्यांची मदत केली आणि त्यांची खराब झालेली गाडी तिथून हटवण्यात आली. रवीने त्याच्या सोशल मीडियावर घटनेचे फोटोही शेअर केल्याचे दिसून आले, ज्यामध्ये त्याच्या दुखापती आणि कारची गंभीर स्थिती दिसून आली. रवीने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘कधीकधी आयुष्य आपल्याला मौल्यवान आठवणी आणि अनुभव देते, जे आपल्याला समजण्यास मदत करतात की आपण किती भाग्यवान आहोत.’ असे अभिनेता म्हणाला आहे.
रवी भाटियाच्या या घटनेनंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता आणि पाठिंबा व्यक्त केला. त्याच्या गाडीचे फोटो पाहून आणि त्याच्या दुखापतींबद्दल जाणून लोक खूप भावनिक झाले आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय, रवीने असेही म्हटले आहे की या घटनेमुळे त्याला जीवनाचे मूल्य आणखी समजून घेण्याची संधी मिळाली आहे.