richa chadha (फोटो सौजन्य -Instagram)
रिचा चढ्ढा आणि अली फजल बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिचा चड्ढा सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करताना दिसत होती, मात्र आता अभिनेत्रीने तिच्या आणि कुटुंबियांना एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. रिचा चढ्ढा आणि अली हे अभिमानी पालक बनले आहेत. अभिनेत्रीने एका छोट्या मुलीला जन्म दिला असून रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी याबाबत एक त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून रिचा आणि अलीला त्यांच्या चाहत्यांनी तसेच कलाकारांनी अभिनंदन केले आहे. या दोघांवर आनंदाचा वर्षाव होत आहे.
रिचा चढ्ढा आणि अली फजलने सांगितली गोड बातमी
अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांनी त्यांचा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदी क्षण शेअर केला आणि लिहिले, “16.07.24 रोजी निरोगी बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या बातमीने आमचे कुटुंब खूप आनंदी झाले आणि आम्ही आमच्या शुभचिंतकांचे प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभारी आहोत. आम्ही खूप आनंदी आहोत.” असे त्यांनी या पोस्टमध्ये सुंदर नोट लिहिली असून, त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रिचा चढ्ढा आणि अली फजल केले अप्रतिम फोटोशूट
रिचा चढ्ढा तिच्या प्रेग्नेंसीच्या काळातही इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये सतत दिसत होती. अभिनेत्रीने नुकतेच तिचे मॅटर्निटी फोटोशूट देखील केले आहे. या फोटोंमधील रिचा आणि अलीला एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. पहिल्या फोटोमध्ये फक्त रिचाचा बेबी बंप दिसत होता, ज्यावर अभिनेत्रीने हात ठेवला होता. दुसरा फोटो या जोडप्याचा अस्पष्ट आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये अली आणि रिचा सोफ्यावर पडलेले दिसत आहेत. या फोटोंसोबत रिचा चढ्ढाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इतके शुद्ध प्रेम जगात प्रकाशाच्या किरणांशिवाय दुसरे काहीही आणू शकते का?’ या पोस्टचा कमेंट सेक्शन रिचा चढ्ढा यांनी बंद केला आहे. याचे कारण स्पष्ट करताना अभिनेत्रीने ही तिच्या आयुष्यातील खासगी बाब असल्याचे म्हटले आहे.
कामाच्या आघाडीवर, रिचा चढ्ढा ही वेब सीरिज हीरामंडीमध्ये शेवटची दिसली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. अली फजल ‘मिर्झापूर ३’ मध्ये दिसला होता. आत हे दोघेदेखील त्यांच्या आयुष्यातील आनंदी क्षण जगताना दिसणार आहेत.