(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेत्री शर्मिला टागोर तिचा मुलगा सैफ अली खानची प्रकृती जाणून घेण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचल्या आहेत. शर्मिला टागोरच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसून येते. सैफ अली खानवरील हल्ल्याच्या २४ तासांनंतर त्याची आई तिच्या मुलाला भेटायला आली आहे. शर्मिला टागोर यांचा रुग्णालयात हजर झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान, मुलगी सारा अली खान, पत्नी करीना कपूर खान, सिद्धार्थ आनंद हे देखील त्याची प्रकृती पाहण्यासाठी उपस्थित झाले होते.
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Actor #SaifAliKhan‘s mother, veteran actor Sharmila Tagore arrives at Lilavati Hospital in Mumbai.
Saif Ali Khan is admitted here following an attack on him. pic.twitter.com/O4eDEy3PIG
— ANI (@ANI) January 17, 2025
सैफवर चाकूने हल्ला झाला.
सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या घटनेत सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. सैफला त्याचा मुलगा इब्राहिम अली खानने ताबडतोब रुग्णालयात नेले. यानंतर, या हल्ल्याच्या तपासासाठी २० पथके तयार करण्यात आली आहेत. त्याच्या शरीरावर चाकूने सहा वार झाले होते, ज्यामध्ये त्याच्या पाठीच्या कण्यावर एक जखम होती. अभिनेता, त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान आणि त्यांचा मुलगा वांद्रे पश्चिम येथील १२ मजली इमारतीत राहतात, जिथे अनेक बॉलिवूड कलाकार राहतात. त्यांचे निवासस्थान चार मजल्यांवर आहे.
Emergency Day 1: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ सिनेमागृहात चालेल का? चित्रपटाची पहिल्या दिवशी होईल एवढीच कमाई!
अभिनेत्याच्या पाठीवरून काढला भाग
या हाय-प्रोफाइल इमारतीत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रतिसादाबद्दल आणि चोर पकडला न जाता अभिनेत्याच्या घरात कसा घुसला याबद्दल गंभीर प्रश्न आहेत. पोलिसांनी सैफ अली खानच्या पाठीवरून काढलेला भाग ताब्यात घेतला आहे. ब्लेडचा काही भाग अजूनही सापडायचा आहे. सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळी टीम तैनात होती, आता त्यांना काहीसं यश हाती आल्याचं पाहायला मिळत आहे. हा आरोपी बांद्रा रेल्वे स्थानकात असलेल्या कॅमेऱ्यातही कैद झाला होता, तो वसई- विरारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसून जाताना दिसत होता. त्याच संशयिताला बांद्रा पोलिसांच्या एका टीमने पकडले आहे. त्याच संशयिताला बांद्रा पोलिसांची टीम आता बांद्रा पोलिस स्टेशन परिसरात दाखल झाली आहे.