फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाचा टीझर आज 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. आज सलमान खानचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे निर्माते त्याच्या चाहत्यांना हे गिफ्ट देणार होते. पण, आता टीझर पुढे ढकलण्यात आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे.
x वर पोस्ट शेअर केली
‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर आज 27 डिसेंबर रोजी सकाळी 11:07 वाजता प्रदर्शित होणार होता. पण, ‘नाडियाडवाला ग्रँडसन’च्या माजी हँडलवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये टीझर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे की, ‘आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने आम्ही दु:खी आहोत. अत्यंत खेदाने कळवत आहोत की ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर पुढे ढकलण्यात आला आहे. असे लिहून त्यांनी चाहत्यांना माहिती दिली आहे.
In light of the passing of our esteemed former Prime Minister Manmohan Singh Ji, we regret to announce that the release of the Sikandar teaser has been postponed to 28th December 11:07 AM. Our thoughts are with the nation during this time of mourning. Thank you for understanding.…
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) December 27, 2024
नवीन प्रकाशन तारीख जाहीर
निर्मात्यांनी पुढे लिहिले की, ’28 डिसेंबर रोजी सकाळी 11:07 पर्यंत टीझर प्रदर्शित केला जाईल. असे त्यांनी सांगितले. या दु:खाच्या काळात आमचे विचार देशासोबत आहेत. तुम्हाला समजेल अशी आशा आहे. धन्यवाद’. ‘सिकंदर’ चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक एआर मुरुगदास यांनी केले आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Bigg Boss 18 : टाइम गॉड चुम दारंगला मिळाली स्पेशल पॉवर, या स्पर्धकाला नॉमिनेशनमधून वाचवलं
रश्मिका मंदान्नासोबत दिसणार अभिनेता
या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल दिसणार आहेत. पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून चाहते करत आहेत. तसेच या चित्रपटाचा टीझर आज रिलीज होणार होता परंतु माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यामुळे त्यांनी हा टीझर पुढे ढकलला. दिल्ली एम्समध्ये त्यांचे निधन झाले. मनमोहन सिंग हे उत्तम अर्थतज्ज्ञ होते. 1991 मध्ये देशात सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाचे ते शिल्पकार देखील होते. 2004 ते 2014 या काळात ते पंतप्रधान होते.