फोटो सौजन्य - Social Media
आज 27 डिसेंबरला अभिनेता सलमान खान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 डिसेंबरच्या रात्री अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. सलमान खानच्या या खास बर्थडे पार्टीला उपस्थित राहण्यासाठी सर्व बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस असल्यामुळे त्याचे चाहते देखील आज आनंदी आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत. याचदरम्यान जाणून घेऊया सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला कोण कोण हजर होते.
पार्टीत सहभागी होण्यासाठी हे स्टार्स आले होते
सलमान खानने आज त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटातील त्याचा पहिला लूक शेअर केला आणि 27 डिसेंबर रोजी टीझर रिलीज करण्याची घोषणा केली. आज बॉबी देओल, निर्वाण, सोहेल खान, निखिल द्विवेदी, युलिया वंतूर, राहुल कनाल यांनी सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. हे सगळे कलाकार अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खान देखील त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचला होता.
हे कलाकार झाले सहभागी
सलमान खानच्या बर्थडे पार्टीला खास बनवण्यासाठी अभिनेता बॉबी देओलही पोहोचला होता. यावेळी तो काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला होता. अभिनेता सोहेल खानही त्याचा भाऊ सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. सलमान खानच्या पार्टीत त्याची एक्स गर्लफ्रेंड युलिया वंतूरही सहभागी झाली होती. आज अभिनेत्यावर चाहत्यांसह अनेक कलाकारही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत.
अरबाज खान, शूरा आणि इतर स्टार्स या सोहळ्याला शोभा देण्यासाठी पोहोचले
सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान देखील या भव्य पार्टीचा भाग बनण्यासाठी पोहचली होती. अरबाज खान त्याची पत्नी शूरा खानसोबत स्पॉट झाला होता. हे दोघेही सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या पार्टीला इतर अनेक स्टार्सही आले होते. सलमानच्या बर्थडे पार्टीत यास्मिन देखील दिसली होती. या सगळ्यांना कलाकरांना पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. सर्वजण पार्टीमध्ये चमकताना दिसले आहेत.
या स्टार्सनेही सहभाग घेतला
रितेश देशमुख आणि जेनेलिया हे प्रसिद्ध जोडपं देखील या पार्टीत सहभागी झाले होता. तसेच, साजिद खान, बरखा सिंग, शब्बीर अहलुवालिया यांनीही सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला कुटुंबासह हजेरी लावली होती. अभिनेता शब्बीर अहलुवालिया त्याच्या कुटुंबासह दिसला. या सगळ्यांना कलाकारांना पाहून नक्कीच अभिनेत्याचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा झाला असेल याचा अंदाज लावू शकतो. सलमान खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदी चित्रपट आणि रिऍलिटी शो केले आहेत. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आणि त्याला सतत पसंत करणारा आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र उत्साह सुरु आहे.