(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानने नुकताच त्याच्या घरातील एक खास व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गणेश चतुर्थीचा सण साजरा करताना दिसत आहे. सगळं कुटुंब एकत्र आनंदी दिसत आहेत. तसेच आता अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पायल रोहतगीने आलिया भट्टवर केली टीका, ‘तुमचे लैंगिक संबंध खासगी, घराची जागा नाही’
सलमान खानने शेअर केला व्हिडीओ
आज सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक खास व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सलमान खानने गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे घरी थाटामाटात स्वागत केली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान बाप्पाची आरती करताना दिसत आहे. पार्श्वभूमीवर गणपतीची आरती ऐकू येत आहे. सलमान व्यतिरिक्त सोहेल, अरबाज आणि सलीम खान यांनीही बाप्पाची आरती केली.
Bigg Boss 19 : कोण होणार बिग बाॅस 19 चा पहिला कॅप्टन! झीशान कादरी नॉमिनेशनमध्ये आल्यावर डोकं चालेना
सलमान खानच्या कामाची ओळख
सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदानाने मुख्य भूमिका साकारली होती. आता सलमान त्याच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमानचा हा चित्रपट गलवानच्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान खान कर्नल संतोष बाबूची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्यांना मरणोत्तर भारताचा दुसरा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कारसोबत महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटाची अभिनेत्याने शूटिंग सुरु केली असून, हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.