2012 च्या हिट ॲक्शन कॉमेडी ‘सन ऑफ सरदार’चा सिक्वेल येत आहे, परंतु दुर्दैवाने, बिल्लू म्हणजेच संजय दत्त ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसणार नाही. यूके सरकारने संजय दत्तचा व्हिसा रद्द केल्याचे बोलले जात आहे. ब्रिटन सरकारने त्यांचा व्हिसा यापूर्वी अनेकदा रद्द केला आहे असे लेखील अभिनेत्याने सांगितले आहे. यावर आता अभिनेता संतापला आहे. खरं तर, 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. या अटकेनंतर संजय दत्तचा युकेचा व्हिसा मंजूर झालेला नाही. ‘सन ऑफ सरदार 2’ साठी त्यांनी पुन्हा अर्ज केला होता, पण ते होऊ शकले नाही. या कारणावर आता अभिनेत्याचा संताप झाला आहे.
व्हिसा रद्द झाल्यामुळे संजय दत्तला आला राग
अभिनेता संजय दत्तने बॉम्बे टाइम्सशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे.अभिनेता म्हणाला की, “मला एक गोष्ट माहित आहे की युके सरकारने ते योग्य केले नाही. सर्व काही तयार होते. मग एक महिन्यानंतर तुम्ही माझा व्हिसा रद्द करत आहात. मी युके सरकारला सर्व आवश्यक कागदपत्रे देखील दिली होती.” तुम्हाला कायदा समजायला एक महिना का लागला, असा सवाल संजय दत्तने उपस्थित केला.’ आणि आपले मत ठामपणे मांडले.
संजय दत्तने सांगितली युकेची समस्या
संजय दत्त इथेच थांबला नाही, त्याने युनायटेड किंग्डमवर आणखी राग काढला. तो म्हणाला, “बरं, युकेला कोणाला जायचे आहे? तिथे खूप दंगली होत आहेत. अगदी भारत सरकारनेही तुम्ही युकेला जाऊ नका, असे विधान जारी केले आहे. त्यामुळे माझं काहीही चुकत नाही. मी त्याचे पालन करत आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी प्रत्येक देशाच्या कायद्यांचा आदर करतो.’ असं अभिनेता या मुलाखतीत म्हणाला.
हे देखील वाचा- सेलेना गोमेझने बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत केले लग्न, सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते थक्क!
‘सन ऑफ सरदार २’ मध्ये संजय दत्त दिसणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या भागाचे चित्रीकरण मुंबईत होणार आहे. हा चित्रपट विजय कुमार अरोरा दिग्दर्शित करत आहेत. आणि या चित्रपटामध्ये अजय देवगण तसेच अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्यभूमीकेत दिसणार आहेत. यांसह अनेक बॉलीवूड स्टार या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग सुरु झाले असून, तो लवकरच प्रदर्शित होईल.