(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत फोटो शेअर करताना दिसत असते आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असते. या दोघांना एकत्र पाहून चाहते यांच्या फोटोला भरपूर प्रतिसाद देखील देतात. परंतु, आता अलीकडेच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. खरंतर, हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आहे की सेलेना आणि बेनीची एंगेजमेंट झाली आहे. एवढेच नाही तर यानंतर अभिनेत्रीने बेनीसोबतचे अनेक रोमँटिक फोटोही एका पोस्टमध्ये शेअर केला आहे.
सेलेना गोमेझने केली एंगेजमेंट
सेलेनाने तिच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोही दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसत नाही आहे. या फोटोमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे सेलेनाची एंगेजमेंट रिंग, जी तिने हार्टच्या इमोजीने लपवली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, दोघांची एंगेजमेंट झाली आहे. एका नेटकाऱ्याने टिप्पणी केली की, ‘सेलेना गोमेझने जाणीवपूर्वक घोषणा न करण्याचा प्रयत्न करत असताना तिने लग्न केल्याचे जाहीर केले आहे’. असे त्याने लिहिले. त्याच वेळी, इतर अनेक नेटकऱ्यांनी देखील गायिकेने एंगेजमेंट केल्याची प्रतिक्रिया दिली.
यासोबतच तिने इंस्टाग्रामवर बेनीसोबत इतरही अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती रोमँटिक पोज देताना दिसत आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांनीही पसंती दिली आहे. गायिकेने काही दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस साजरा केला होता आणि त्यादरम्यान ती बी नावाचा पेंडेंट फ्लाँट करताना दिसली आहे.