राम कपूरने केले 42 किलो वजन कमी
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांचा उल्लेख आला की ‘घर एक मंदिर’ वा ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेचे नाव नक्कीच घेतले जाते. या लोकप्रिय टीव्ही मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर, गौतमी गाडगीळ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. टीव्हीनंतर चित्रपटांमध्येही राम कपूरने आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकून घेतले. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर असणारा राम कपूर आता अचानक प्रकाशझोतात आलाय आणि आता राम कपूरच्या एका सोशल मीडिया पोस्टने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
51 वर्षीय राम कपूर युधरा या चित्रपटात दिसला होता. तो काही काळ सोशल मीडियापासून दूर होता आणि आता अभिनेत्याच्या ताज्या पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ज्या वयात लोक आजारांना बळी पडतात त्या वयात त्यांचे वजन कमी करून तरुणांचे मनोबल वाढवण्याचे काम रामने केले आहे. 42 किलो वजन कमी करून त्याने कमालीचे ट्रान्सफॉर्मेश केल्याचे दिसून येत आहे (फोटो सौजन्य – Instagram)
रामचा वेट लॉस फोटो
अभिनेता राम कपूरने पत्नी गौतमी कपूरसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो अगदी फिट दिसत आहे. अभिनेत्याने फोटोखाली कॅप्शन लिहिले आहे की, त्याने 42 किलो वजन कमी केले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर सक्रिय नसल्याबद्दल क्षमस्व. खरंतर मी स्वतःवर काम करत होतो आणि त्यामुळेच मी सोशल मीडियापासून दूर होतो’
फोटो व्हायरल
राम कपूरचे वेट लॉस करतानाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासावर चाहतेही सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुमच्या क्षमतेमुळे आणि जिद्दीमुळे हे शक्य झाले आहे.’ दुसऱ्याने कमेंट केली, ‘काय अप्रतिम परिवर्तन, मला तुझा बडे अच्छे है लुक आवडतो.’ आणखी एका युजरने सांगितले की, तिला तिचा पूर्वीचा लूक जास्त आवडला. तर अनेकांना राम कपूरचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सुखाचा धक्का मिळालाय आणि त्यांनी प्रेमाचे अनेक इमोजी पोस्ट केले आहेत.
काय म्हणाला राम कपूर
2019 मध्येही केले होते वजन कमी
राम कपूरने यापूर्वीदेखील 2019 मध्ये वजन कमी करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी त्याने व्यायाम आणि इंटरमिटेंट फास्टिंगचा आधार घेतला होता. 16 तास राम कपूर उपाशी राहत होता आणि आपल्या डाएटिशिनचा सल्ला योग्य पद्धतीने पाळत होता. केवळ 8 तासाच्या मध्ये तो आपल्या शरीरासाठी योग्य असणारे अन्नपदार्थ खात असे. यापूर्वी राम कपूरचे वजन हे 130 किलो होते आणि आता तर 51 व्या वर्षी त्याने कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन दाखवले आहे.
Bibek Pangeni: बिबेक पंगेनीची कॅन्सरशी झुंज अपयशी; इन्फ्लूएंसरच्या निधनाने सोशल मीडियावर शोककळा!
स्वतःकडे दिलं लक्ष
राम कपूरने 2019 पासून स्वतःकडे अधिक लक्ष द्यायला सुरूवात केली आहे आणि आपल्या पत्नीसह त्याने फोटो पोस्ट करत काहीही अशक्य नाही हेच पुन्हा दाखवून दिलं आहे. मनात असेल तर योग्य वर्कआऊट करून आणि हेल्दी खाऊन वजन कमी करता येते. राम कपूरने तरूणांना एक आदर्शच घालून दिला आहे.