(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दिलजीत दोसांझच्या ‘दिल-लुमिनाटी’ या टूरने भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता, हा गायक आणि अभिनेता त्याच्या आगामी ‘पंजाब ९५’ चित्रपटाने धुमाकूळ घालत आहे. बुधवारी, अभिनेत्याने चित्रपटातील अनेक खास छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांद्वारे दिलजीतने त्याच्या व्यक्तिरेखेची झलक चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्यांनी ही शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘पंजाब ९५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे एकाच फ्रेम दिसणार, ‘देवमाणूस’च्या चित्रीकरणाला सुरुवात
या दिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार
अभिनेत्याने पोस्ट शेअर करताना, दिलजीत दोसांझने चित्रपटाच्या टीझरची रिलीज तारीखही सांगितली आहे. या अभिनेत्याने जाहीर केले की चित्रपटाचा टीझर १७ जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. दिलजीत दोसांझचा ‘पंजाब ‘९५’ हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट गेल्या एक वर्षापासून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून मंजुरीची वाट पाहत होता. परंतु आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दिलजीतने शेअर केली झलक
दिलजीत दोसांझने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, जसवंत सिंग खलरा म्हणून अभिनेता तुरुंगात बसून शांततापूर्ण क्षण टिपताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये, दिलजीत वर्तमानपत्र उलटताना दिसत आहे. पंजाब ९५ मधील या चित्रपटात तो अंत्यसंस्काराच्या चितेकडे बारकाईने पाहत असल्याचे दाखवले आहे, जे चित्रपटाच्या गंभीर विषयाचे प्रतिबिंब आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाची कथा स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
‘हिरामंडी’ फेम अभिनेता गायिका तुलसी कुमारच्या नव्या प्रोजेक्टमध्ये चमकणार; शूटिंगचा Video Viral
हा चित्रपट जसवंत सिंग खलरा यांच्या जीवनावर आधारित आहे.
दिलजीत दोसांझचा ‘पंजाब ‘९५’ हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा यांच्या जीवनावर आधारित आहे. याआधी, दिलजीतने चित्रपटातील एक दृश्य शेअर केले होते, ज्यामध्ये त्याने कॅप्शन दिले होते, ‘मी अंधाराला आव्हान देतो’, जो खलराच्या न्यायासाठीच्या लढाईच्या शक्तिशाली कथेकडे संकेत देतो.’ या पोस्टने चाहते चकित झाले होते. अभिनेत्याची ही लक्षवेधी भूमिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. आता सगळ्यांचे लक्ष चित्रपटाच्या टीझरवर लागले आहेत.