फोटो सौजन्य - Social Media
ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनू सूद यांनी ‘जोधा अकबर’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटात सोनू ऐश्वर्याला वाचवण्यासाठी अनेक जोखमीच्या गोष्टी करतो. आता अलीकडेच, अभिनेत्याने अभिनेत्रीसोबत सेटवर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. यासोबतच त्याने सांगितले की, ऐश्वर्या रायने त्याला सांगितले होते की सोनू तू मला पप्पांची आठवण करून देतोस. अभिनेता आणखी काय म्हणाला जाणून घेऊयात.
असे ऐश्वर्याने सोनूला सांगितले होते
सोनूने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही त्यावेळी चित्रपटाचे शूटिंग करत होतो. ऐश्वर्या एक सीन करत होती. ती अचानक थांबली आणि मला म्हणाली की तू मला पप्पांची आठवण करून देतोस.’ ऐश्वर्या खरोखरच एक उत्तम कलाकार आहे. अभिनेता म्हणाला की, ‘माझे त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.’ सोनूने अभिषेकसोबत ‘हॅप्पी न्यू इयर’मध्ये काम केले होते. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत सोनूने ‘बूढ़ा होगा तेरा बाप’मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.
“झुकेगा नहीं साला…” कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याने दिलजीत दोसांझची नाराजी
लोकांना सोनू सूद वाढला अभिषेक
अभिनेत्याने पुढे खुलासा केला की, तो एकदा इजिप्तला जात होता. यावेळी अनेकांनी त्याला अभिषेक मानले. तो म्हणाला की, “मी इजिप्तला पोहोचताच तिथल्या लोकांनी मी त्यांचा मुलगा आहे असे समजले. ते ‘अमिताभ बच्चन यांचा मुलगा, अमिताभ बच्चन यांचा मुलगा’ असे बोलू लागले. त्यामुळे मला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, त्यांनी मला रांगेतून बाहेर काढले आणि वेगळे केले, मला ते खूप आवडले.” असे अभिनेत्याने या मुखातील सांगितले.
या सीनबद्दल सोनूला संकोच वाटत होता
याशिवाय ‘बूढ़ा होगा तेरा बाप’ मधला बिग बींना ढकलतानाचा एक सीनही सोनूला आठवला. तो म्हणाला की तो सीन पाहून खूप संकोच वाटत होता. या सीनमध्ये सोनूने अमिताभ बच्चन यांना खूप हळूवार धक्का दिला. तथापि, नंतर अमिताभ बच्चन यांनीच सांगितले की काळजी करू नकोस आणि मला जोरात ढकल, त्यानंतर मी त्यांना ढकलले आणि ते दृश्य खूपच चांगले झाले.’ असे त्यांनी सांगितले.
Pushpa 2: रेकॉर्डब्रेक ‘पुष्पा 2’ ला उत्तर भारतीय सिनेमागृहातून हटवले? जाणून घ्या काय आहे कारण!
अभिनेत्याचा आगामी चित्रपट
अभिनेत्याचा लवकरच नवीन वर्षाला नवा चित्रपट रिलीज होणार आहे, ज्याचे नाव फतेह आहे. या चित्रपमध्ये अभिनेत्यासह अनेक मोठे स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. यांसह या चित्रपट येत्या १० जानेवारी २०२५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जॅकलिन फर्नांडिसने फतेह (सोनू सूद) च्या लेडी लव्हची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेता या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.