फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम
सिनेमागृहांप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. सध्या ओटीटीवर दाक्षिणात्य थ्रिलर सिनेमांची तुफान चर्चा आहे.साऊथचे काही सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. दर आठवड्याला होणाऱ्या नव्या रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम असते आणि या आठवड्यातही एक हाय रेटेड चित्रपट रिलीज होत आहे,जो कमी बजेटमध्ये तयार झाला आहे. तो म्हणजे ‘मिशा’ चित्रपट या चित्रपटाने IMDb वर 9.4 असा उत्कृष्ट स्कोर मिळवला आहे. ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
तुम्हाला हा चित्रपट आवडला का?
मीशा हा २०२५ चा भारतीय मल्याळम-भाषेतील सर्वायव्हल ड्रामा चित्रपट आहे. ‘मीशा’चे दिग्दर्शन एम.सी. जोसेफ यांनी केले असून यात कथिर, शाइन टॉम चाको आणि सुधी कोप्पा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
अनोख्या कथानकासाठी आणि जबरदस्त अभिनयासाठी हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा केवळ एक सामान्य अॅक्शन थ्रिलर नाही, तर मैत्री, अहंकार, राजकारण आणि वर्गसंघर्ष यांसारख्या गहन विषयांना नवे दृष्टिकोनातून मांडतो.दिग्दर्शकाने मित्रांमधील आदर्श आणि ईर्षा यांसारख्या गुंतागुंतीच्या भावनांचा नात्यांवर होणारा परिणाम एका थरारक कथानकातून प्रभावीपणे दाखवला आहे.
‘तो थेट बेडरूममध्ये शिरला अन्…’, सैफ अली खानची बहीण सोहाच्या घरीही घुसलेला अज्ञात व्यक्ती ?
एका दुर्गम जंगलात घडणारी, मीशा ही कथा अशा पुरुषांच्या गटाची आहे ज्यांचे जीवन उलथापालथ होते जेव्हा त्यांना त्यांच्या नैतिकतेची आणि जगण्याच्या प्रवृत्तीची परीक्षाघेणाऱ्या एका प्राणघातक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. निसर्ग जवळ येताच, दडलेले रहस्ये, विश्वासघात आणि वैयक्तिक सूड उलगडतात, ज्यामुळे एक तणावपूर्ण, भावनिकदृष्ट्या भरलेला अश्या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.‘मीशा’ हा गहन कथा आणि दमदार अभिनय शोधणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हा चित्रपट मलयाळम आणि तमिळ भाषेत 12 सप्टेंबर 2025, म्हणजेच आज सन नेक्स्टवर पाहता येणार आहे.