(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा चाहत्यांच्या आवडत्या शोपैकी एक आहे. हा शो गेल्या 16 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या काळात या शो मधील कलाकारांना अनेक वादांनाही सामोरे जावे लागले. मात्र, असे असूनही या शोला आणि त्यातील कलाकारांना लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. मग ते दिलीप जोशी ‘जेठालाल’ असोत किंवा शरद सांकला ‘अब्दुल’ असोत. सगळ्या कलाकारांवर चाहत्यांनी भरपूर प्रेम केले आणि या मालिकेला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली.
त्याचबरोबर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या अनेक कलाकारांनी सध्या या शोचा निरोप घेतला आहे. नुकताच ‘गोली’ क्रेझचा व्हिडिओ समोर आला आहे. आता या शोशी संबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरं तर, अब्दुल शोमधून गायब झाला आहे लेटेस्ट एपिसोड मध्ये हा कलाकार दिसलाच नाही आहे. याच बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शरद संकला शोमधून बाहेर?
वास्तविक, नुकत्याच झालेल्या काही एपिसोड्समध्ये गोकुळधाम सोसायटीतून अब्दुल गायब झाल्याचे दिसून आले, जेव्हा गोकुळधामच्या लोकांना हे कळले तेव्हा सर्वांना त्याची काळजी वाटू लागली आणि ते अब्दुलचा शोध घेऊ लागले, परंतु अब्दुलचा पत्ताच नाही. हे पाहिल्यानंतर अब्दुल म्हणजेच शरद सांकला यांनीही शो सोडला असल्याचा अंदाज लोक बांधू लागले आहेत.
Sharad Sankla (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
हे देखील वाचा- तारक मेहता का उल्टा चष्मा फेम गुरुचरण सिंग घरी परतला, गेल्या 25 दिवसांपासून होता बेपत्ता
त्याच वेळी, जेव्हा गोली म्हणजेच कुश शाह शोमधून बाहेर होता, तेव्हा असेच काही दाखवण्यात आले होते की तो बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. अशा परिस्थितीत प्रेक्षक त्याच्याशी जोडून बघत आहेत. मे महिन्यातही शरदने शो सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण तो पुन्हा शोमध्ये दिसला आणि त्या अफवांना पूर्णविराम मिळाला. परंतु आता खरंच शरद संकला यांनी हा शोचा निरोप घेतला आहे की ‘तारक मेहता का उल्टा चष्मा शोच्या आशयाचा हा एक भाग आहे, हे येत्या एपिसोडमध्येच दिसेल.