(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने अनुपम खेर स्टुडिओच्या सहयोगाने नुकतेच “तन्वी द ग्रेट” या फिल्मचे विशेष स्क्रीनिंग आयोजन केले. मुंबईतील लोअर परेलमधील पीव्हीआर पॅलेडियममध्ये पार पडलेला हा कार्यक्रम म्हणजे टाटा पॉवरचा प्रमुख उपक्रम पे ऑटेन्शनअंतर्गत उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. ऑटिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबद्दल अधिक जास्त जागरूकता, अधिक समज आणि स्वीकार निर्माण करणे तसेच एक व्यापक न्यूरोडायव्हर्सिटी स्पेक्ट्रम उभारणे हा यामागचा उद्देश आहे.
टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ प्रवीर सिन्हा आणि दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक श्री अनुपम खेर हे या स्क्रीनिंगसाठी उपस्थित होते, त्यांच्यासोबत टाटा पॉवरचे अधिकारी आणि तब्बल ७०० लोक देखील सहभागी झाले होते. न्यूरोडायव्हर्स मुले, त्यांची काळजी घेणारे, शिक्षक, टाटा ग्रुपमधील अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सरकारी प्रतिनिधी आणि इतर हितधारकांचा यामध्ये समावेश होता. या अनुभवाला अधिक खोली प्रदान करण्यासाठी पे ऑटेन्शन सेन्सरी एक्स्पीरियंस झोन उभारण्यात आला होता. सर्वसमावेशक सेन्सरी वातावरण निर्माण करण्यासाठी काम करणारे स्टार्टअप सेन्सरी ऑलने हा झोन तयार केला आहे. एका वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या या झोनला भेट देणाऱ्यांना न्यूरोडायव्हर्स दृष्टिकोनातून या जगाविषयी जाणून घेण्याची अनोखी संधी मिळाली.
या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून टाटा पॉवर आणि अनुपम खेर स्टुडिओ “तन्वी द ग्रेट” चे विशेष स्क्रीनिंग आणि पे ऑटेन्शन एक्स्पीरियंस झोन यांचे आयोजन दिल्ली, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये देखील करणार आहे. न्यूरोडायव्हर्स आणि न्यूरोटिपिकल व्यक्ती, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, न्यूरोडायव्हर्स व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि धोरण हितधारक यांच्यासाठी सर्वसमावेशक जागा निर्माण करणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री, खास भूमिकेत झळकणार अभिनेता!
टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी, डॉ प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “टाटा पॉवरमध्ये पे ऑटेन्शनच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक वर्षे अतिशय निष्ठेने आणि बांधिलकीच्या भावनेने न्यूरोडायव्हर्सिटीला प्रोत्साहन देत आहोत. न्यूरोडायव्हर्स व्यक्तींसाठी आणि त्यांच्या काळजी घेणाऱ्यांसाठी जागरूकता आणि पाठिंबा निर्माण करण्याच्या उद्देशावर भर देऊन हे प्रयत्न केले जातात. अनुपम खेर स्टुडिओसोबत “तन्वी द ग्रेट” मुव्हीसोबत आमचा सहयोग म्हणजे न्यूरोडायव्हर्सिटीबद्दलचा संवाद मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कथाकथनाच्या प्रभावाचा वापर करून योग्य दिशेने उचलेले पाऊल आहे. ही फिल्म आपल्याला आठवण करून देते की, ऑटिजमने ग्रस्त असलेल्या व्यक्ती कमी नाहीत, वेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये असामान्य क्षमता आहेत. हे वेगळेपण साजरे करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या खऱ्या क्षमता वापरता याव्यात यासाठी आपल्याला सर्वांना त्यांच्यासोबत, त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल.” असे ते म्हणाले आहेत.
‘पुष्पा २’ आणि ‘अॅनिमल’ला दिली टक्कर? ‘Saiyaara’ ने रचला इतिहास, बनवला नव्या रेकॉर्ड
विख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक श्री अनुपम खेर यांनी सांगितले, “आपल्या सर्वांची एक कहाणी असते, जी आपल्याला आकार देते, प्रेरित करते आणि आपल्या कहाण्याच आपल्याला एकमेकांशी जोडतात. चांगुलपणा आणि समावेशनाचा सन्मान करणाऱ्या कहाण्यांवर प्रकाश टाकणे ही कथाकथनकार म्हणून आपली जबाबदारी आहे. ‘तन्वी द ग्रेट’ हा सिनेमा माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे, माझी भाची तन्वी, जी इतर अनेक न्यूरोडायव्हर्स व्यक्तींप्रमाणे आहे, तिच्यापासून, तिची असामान्य प्रतिभा आणि क्षमतांपासून प्रेरणा घेऊन ही फिल्म तयार करण्यात आली आहे. ” असे त्यांनी सांगितले आहे.
‘तन्वी, द ग्रेट’ ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे एका युवा न्यूरोडायव्हर्स मुलीची जिने समाजाच्या चौकटी झुगारून देऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घेतली. ऑटिजम स्पेक्ट्रमवरील व्यक्तींच्या आड येणारी आव्हाने आणि त्यांच्या क्षमता यांचे चित्रण या फिल्ममध्ये अतिशय संवेदनशीलपणे करण्यात आले आहे. समावेशन, स्वीकार आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता याविषयी महत्त्वपूर्ण संवादाला प्रोत्साहन देते.