(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज कमाई करून निर्मात्यांचे खिस्से भरत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. तथापि, असे बरेच लोक आहेत ज्यांना हा चित्रपट फारसा आवडला नाही आणि ते मोहित सुरीला ट्रोल करत आहेत. या सर्वांमध्ये, ‘सैय्यारा’ने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ नंतर, मोहित सुरीच्या ‘सैय्यारा’ने सुट्टी नसलेल्या दिवशी सर्वाधिक कमाई करून नवा रेकॉर्ड मिळवला आहे.
सहाव्या दिवशीही Saiyaara चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १५० कोटींचा आकडा केला पार
‘सैय्यारा’ने आणखी एक विक्रम नोंदवला
विरल भयानी यांच्या पोस्टनुसार, अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट सुट्टी नसलेल्या दिवशी म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी सर्वाधिक कमाई करत आहे. बुधवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘पुष्पा २’ आणि ‘अॅनिमल’ नंतर, ‘सैय्यारा’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
‘सैय्यारा’चा बॉक्स ऑफिस कलेक्शन
सैय्याराच्या ताज्या कलेक्शनवर नजर टाकली तर, सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सोमवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याने २४ कोटी रुपयांची कमाई केली. मंगळवारी २५ कोटी आणि बुधवारी २१ कोटी रुपयांच्या व्यवसायासह, सैय्याराचा एकूण कलेक्शन १५३ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. तसेच हा चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री, खास भूमिकेत झळकणार अभिनेता!
अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत बंपर ओपनिंग करणारा ८ वा हिंदी चित्रपट ठरला आहे. याशिवाय, २०२५ मध्ये ‘छावा’, ‘सिकंदर’ आणि ‘हाऊसफुल ५’ नंतर, ‘सैय्यारा’ने या वर्षी सर्वाधिक कमाई करत बंपर ओपनिंग केली आहे. ज्या प्रकारे हा चित्रपट सुट्टीशिवाय जबरदस्त कमाई करत आहे, तो लवकरच बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असे वाटत आहे.






