फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ फिनाले : टेलिव्हिजनवरचा चर्चित रिॲलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. आज बिग बॉस १८ चा विजेता देशाला मिळणार आहे, त्यामुळे प्रेक्षक आज विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या आठवड्यात स्पर्धकांना आरसा दाखवण्यासाठी मीडिया घरामध्ये त्याच्या खोचक प्रश्नांचा मारा करण्यासाठी आली होती. यावेळी बिग बॉसच्या स्पर्धकांना असे अनेक प्रश्न आणि केलेल्या वक्तव्याचा जबाब विचारण्यात आला होता यामध्ये मीडियाने विचारलेल्या प्रश्नाचे काही स्पर्धकांकडे उत्तर नव्हते. कालचा भाग फारचं मनोरंजक राहिला आहे, यामध्ये मीडियाने पुन्हा एकदा फक्त स्पर्धकांनाच नाही तर बिग बॉसच्या मेकर्सला देखील आरसा दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
कालच्या कालच्या भागांमध्ये बिग बॉस १८ चे टॉप ६ स्पर्धकांच्या स्पोर्ट्सला घरामध्ये एन्ट्री देण्यात आली होती. यावेळी बिग बॉसने घरामध्ये मीडियाला बोलावण्यात आले होते. यावेळी करणवीर मेहराला सपोर्ट करण्यासाठी शिल्पा शिंदे आणि बरखा बिष्ट त्याचबरोबर चुम दारंग आणि करणवीर मेहेराला सपोर्ट करण्यासाठी निर्माता संदीप सिकंद घरामध्ये आले होते. विवियन डिसेनाला सपोर्ट करण्यासाठी विकी जैन आणि दिग्दर्शक स्नेहील दीक्षित मेहरा तर अविनाश मिश्राला सपोर्ट करण्यासाठी निर्माता वेदराज आणि रजत दलालला सपोर्ट करण्यासाठी एल्विश यादव आणि ईशा सिंह हिला सपोर्ट करायला तिचा भाऊ घरामध्ये आला होता.
यावेळी स्पर्धकांच्या स्पोर्ट्सला मीडियाने घेरले होते. या संपूर्ण सिझनमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. यामुळे सोशल मीडियावर शोला मोठ्या प्रमाणत ट्रोल देखील करण्यात आले आहे. आता कालच्या भागामध्ये पत्रकाराने बिग बॉसच्या घरामध्ये मेकर्सला एक्सपोज केले आहे. काल पत्रकार मुकेश यांनी संगितले की जेव्हा घरामध्ये असे काही स्पर्धक आहेत जे स्वतः चिखल घेऊन आले आहेत आणि आता मीडियावर आरोप लावत आहेत. बिग बॉस १८ चा पूर्ण सिझन अविनाश आणि इशा यांना काहीही न बोलता इथपर्यंत आणण्यात आले आहे.
जेव्हा अविनाशने चाहतला बरेच काही बोललं होत तिच्या वैयक्तिक जीवनावर बोलण्यात आले तेव्हा त्याला सॉरी म्हणायला सांगितले आणि मुद्दा थांबवला. पण दुसरीकडे जेव्हा अविनाशला वूमननाझर बोलण्यात आले तेव्हा त्याच्यासाठी अदालत ठेवण्यात आली तेव्हा कोणी काही बोलले नाही. पण आता तोच मुलगा जेव्हा मीडिया येते आणि त्यांना रिॲलिटी चेक देते त्यानंतर तो घरामध्ये जाऊन त्याची एवढी हिंमत होते घरामध्ये जाऊन तो माईकवर हात ठेवून म्हणतो की आपण मीडिया पॅकेज न घेतल्यामुळे आपल्याला आता टार्गेट केले जात आहे. हे दिसून येते की त्यांना खरं ऐकण्याची सवय नाहीये. त्यानंतर बिग बॉस ने त्यांना मध्यस्थी थांबवले आणि पत्रकार परिषद बंद करण्यात आली.