फोटो सौजन्य - primevideoin
बिग बाॅस 19 च्या नव्या सिझनची चर्चा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या सलमानच्या नव्या शोमध्ये कोणते नवे स्पर्धक शोमध्ये सामील होणार याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. त्याआधी आता करण जोहर नवा शो द ट्रेटर्स प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. त्यामध्ये मोठ्या सेलिब्रेटींच्या नावांचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वीच या शोचे लाॅंचिंग झाले होते यामध्ये स्पर्धकांचे चेहरे दाखवण्यात आले होते. द ट्रेटर्स यामध्ये 20 सेलिब्रेटीं सहभागी होणार आहेत या शोचा काल प्रिमियम झाला आहे. यांसदर्भात अनेक बातम्या समोर आल्या आहेत.
चित्रपट निर्माते करण जोहरचा रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’ आला आहे. या शोचे पहिले तीन भाग गुरुवारी रात्री ८ वाजता प्रसारित झाले. प्राइम व्हिडिओवर दार ठोठावणाऱ्या या शोने पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच भागात एक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम म्हणजे फक्त ५ मिनिटांत शोमधून एका स्पर्धकाला एलिमिनेट करणे. रिअॅलिटी शोमध्ये सहसा काही दिवस किंवा आठवड्यानंतर एलिमिनेट केले जाते, तर ‘द ट्रेटर्स’ने पहिल्याच आठवड्यात एलिमिनेट केले. एलिमिनेट झालेली स्पर्धक म्हणजे निकिता लूथर.
खरं तर, ‘द ट्रेटर्स’च्या पहिल्याच भागात, होस्ट करण जोहरने सर्व २० स्पर्धकांना एक असे नाव निवडण्यास सांगितले ज्यावर ते सध्या विश्वास ठेवू शकतील. या दरम्यान, उर्फी जावेदने अपूर्वा मुखिजाचे नाव घेतले. करण कुंद्राने साहिल सलाथियाचे नाव घेतले. रफ्तारने लक्ष्मी मंचूचे नाव घेतले, तर लक्ष्मीने निकिता लूथरचे नाव घेतले. शेवटी, एलनाझ नौराजी उरली, ज्यांच्यावर कोणीही विश्वास दाखवला नाही.
पहिला गद्दार म्हणून युट्यूबर पुरव झा यांची निवड केली. दुसरे नाव एलनाज नौराजी होते, तर तिसरे नाव शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांचे होते. तीन ट्रेटर्स निवडल्यानंतर, करण जोहर म्हणाला की सर्व स्पर्धकांना आपापसात चर्चा करण्याची आणि ट्रेटर्स कोण आहे आणि कोण निर्दोष आहे हे सांगण्याची संधी देण्यात आली होती. सर्वांनी राज कुंद्रा असे नाव घेतले. त्यांचा अंदाज बरोबर होता.
‘द ट्रेटर्स’ दरम्यान, सर्व स्पर्धकांना स्लिप टाकून ‘द ट्रेटर्स’ निवडण्यास सांगण्यात आले. या दरम्यान, करण कुंद्राला सर्वाधिक मते मिळाली. जरी करण कुंद्रा हा ट्रेटर्स नव्हता, परंतु वर्तुळाच्या संशयाच्या आधारे, तो इतर स्पर्धकांचे लक्ष्य बनला आणि त्याला ‘द ट्रेटर्स’मधून बाहेर काढावे लागले.