(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टायगर श्रॉफ पुढील महिन्यात ‘बागी ४’ चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. एकीकडे त्याचे सर्व चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असतानाच दुसरीकडे या चित्रपटाच्या सेटवरून एक वाईट बातमी आली आहे. या सेटवरील दोन कलाकार १२ फूट उंचीवरून जमिनीवर पडले. दोघेही शूटिंगच्या तयारीत व्यस्त होते. मात्र, त्यादरम्यान त्यांच्यासोबत एक अपघात झाला, त्यानंतर दोघांनाही मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या दोघांची तब्येत कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
सोमवारी संध्याकाळी मड आयलंड येथील चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले, ‘बागी ४’ च्या पॅचवर्क दरम्यान दोन कलाकार जखमी झाले आहेत. त्यांना मालाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहिल्या व्यक्तीचे नाव शमीम आहे, जो बंदुक पुरवठा विभागाचा आहे आणि तो एका अॅक्शन सीनच्या शूटिंगची तयारी करत होता.’ असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या कलाकाराचे नाव काय होते?
पुढे ते म्हणाले की, “दुसऱ्या कलाकाराचे नाव शाहनवाज आहे, जो एक ज्युनियर आर्टिस्ट आहे. जेव्हा ते दोघेही खाली पडले तेव्हा दोघेही १२ फूट उंचीवर उभे होते.” अशोक दुबे यांनी असेही सांगितले की त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला दोन्ही जखमी क्रूला पाहण्यासाठी पाठवले होते. तसेच आता या दोघांची तब्येत कधी आहे हे देखील त्यांनी सांगितले आहे.
प्रोडक्शनने उपचारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले
अशोक दुबे यांनी असेही म्हटले आहे की, “मी प्रोडक्शनशी बोललो आहे आणि त्यांनी मला सांगितले आहे की दोन लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी मला वचन दिले आहे की ते दोघांच्याही उपचाराचा खर्च उचलतील.” ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्या दिवशी चित्रपटामधील गाण्याचे शूटिंग सुरू होते. टायगर श्रॉफ त्या गाण्याचा भाग होता. त्यानंतर तो सेटवरून निघून गेला. ही दुर्घटना घडली तेव्हा तो सेटवर नव्हता. असे त्यांनी म्हटले आहे.
दोन लग्न केल्याप्रकरणी युट्यूबर अरमान मलिक अडकला अडचणीत, तिघांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल
‘बागी ४’ मध्ये टायगर दिसणार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्त देखील या चित्रपटात दिसणार आहे. तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. सोनम बाजवा आणि हरनाज कौर संधू देखील या चित्रपटाचा भाग आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ११ ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. ए. हर्ष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि साजिद नाडियाडवाला त्याचे निर्माते आहेत.