(फोटो सौजन्य-Instagram)
नाग अश्विनच्या साय-फाय पौराणिक थ्रिलर कल्की 2898 एडीमध्ये अर्जुनची भूमिका साकारल्यानंतर, विजय देवरकोंडा पुन्हा पडद्यावर ॲक्शनची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय देवरकोंडा यांचा आगामी चित्रपट VD 12 चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये तो खूप खतरनाक दिसत आहे. त्याचा हा लुक पाहून चाहत्यांना हा चित्रपटाची आतुरता होत आहे.
विजय देवरकोंडा गेल्या काही काळापासून फॅमिली ड्रामा सिनेमांमध्ये दिसत आहे. ‘लिगर’ नंतर तो ॲक्शन रोलमध्ये दिसलेला नाही. तथापि, 2 वर्षांनंतर, विजय देवरकोंडा त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात भयानक अवतारात परतण्याची तयारी करत आहे. VD 12 चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
VD 12 मधून विजयचा पहिला लुक आला समोर
विजय देवरकोंडा यांचा चित्रपट VD 12 ची घोषणा गेल्या वर्षी जानेवारीमध्ये करण्यात आली होती आणि पहिले पोस्टर शेअर करण्यात आले होते ज्यामध्ये अभिनेत्याचा लूक समोर आला नव्हता. आता VD 12 चे एक दमदार पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये विजय देवरकोंडा एका भयानक अवतारात दिसत आहे. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या, काळोख्या रात्री किंचाळणाऱ्या अभिनेत्याचा हा लूक कुणालाही थक्क करायला पुरेसा आहे.
VD 12 कधी रिलीज होणार
विजय देवरकोंडा यांनी VD 12 च्या दमदार पोस्टरसह असे कॅप्शन लिहिले आहे, जे चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. “त्यांचे नशीब त्यांची वाट पाहत आहे. चुका, रक्तपात, प्रश्न, पुनर्जन्म,” अभिनेता म्हणाला. चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. ऑगस्ट महिन्यात शीर्षकाचे अनावरण केले जाईल. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना 8 महिने वाट पाहावी लागणार आहे. विजय देवरकोंडा यांचा हा चित्रपट २८ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
कामाच्या आघाडीवर, विजय देवरकोंडा शेवटचा मृणाल ठाकूरसोबत द फॅमिली स्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच याआधी तो कुशीमध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत दिसला होता. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटामध्ये त्याची नवी भूमिका आणि लुक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.