हॉरर कॉमेडी 'स्त्री ३' केव्हा येणार? राजकुमार रावने केलेल्या खुलाशामुळे चाहत्यांमध्ये निराशा; नेमकं अभिनेता काय म्हणाला
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट स्त्री 2 महिनाभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बरीच कमाई केली असून अनेक विक्रमही मोडले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईच्या बाबतीत ॲनिमल, गदर 2, पठाण, जवान आणि पीकेसह अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे.
स्त्री 3 मध्ये पत्रलेखा दिसणार?
यानंतर, निर्मात्यांनी देखील घोषणा केली होती की या चित्रपाचा तिसरा भाग देखील लवकरच येणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा यांची जोडी खूप आवडली होती. जेव्हा राजकुमार राव यांची पत्नी पत्रलेखा यांना विचारण्यात आले की तिला स्त्री फ्रेंचायझीच्या तिसऱ्या हप्त्यात काम करायला आवडेल का? यावर त्यांनी अतिशय उत्कृष्ट उत्तर दिले आणि अभिनेत्रीने तिचे मत मांडले.
राजकुमारची श्रद्धासोबतची जोडी हिट आहे
पत्रलेखा नुकतीच अनुभव सिन्हा यांच्या IC 814: The Kandahar Hijack या वेब सीरिजमध्ये दिसली होती. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत पत्रलेखाला विचारण्यात आले होते की तिला स्त्री 3 मध्ये तिचा पती राजकुमार राव सोबत काम करायला आवडेल का? यावर ती म्हणाली की, “नाही, श्रद्धा आहे ना? त्यांची जोडी खूप मस्त आहे. अभिषेक आहे, अपार आहे, पंकज आहे, हे सगळे भारी आहेत.” असे तिने सांगितले.
‘स्त्री 2’ हा त्याच नावाच्या 2018 साली आलेल्या स्त्री चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात चंदेरी शहरातील भयानक भुताटकीच्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘स्त्री 2’ चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे यांच्या सहकार्याने झाली आहे.