(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीव्ही अभिनेता करण पटेल याने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ‘ये हैं मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेतील ‘रमन भल्ला’ म्हणून ओळखले जाणारा करण पटेल ६ वर्षांच्या ब्रेकनंतर लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. या कमबॅकची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
६ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर असलेले करण पटेल आता पुन्हा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. त्याने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून, ‘चांगला काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होतो’ असे त्याने सांगितले आहे. त्याने दीपिका पादुकोणच्या प्रेग्नन्सीबद्दल एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने काम मागितले होते. आता त्याला एक नवीन टीव्ही शो मिळाल्याची माहिती आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये करण पटेल याची ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेमुळे विशेष ओळख आहे. त्याच्या या कमबॅकमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी-कुकिंग शो लाफ्टर शेफचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोच्या अनाउंसमेंटनंतर जुने कंटेस्टंट्स उत्साहात पाहायला मिळत आहेत., तर चाहत्यांमध्येही त्यांच्या आवडत्या शोसाठी मोठा उत्साह आहे.
आता बातमी अशी आहे की, टीव्ही अभिनेता करण पटेल या कॉमेडी-कुकिंग शोचा भाग होणार आहेत. त्याला शोच्या नवीन सीझनसाठी ऑफर मिळाली आहे.
“तो चप्पल फेकून मारेल”, राखी सावंतने सलमान खानबद्दल ही गोष्ट का सांगितली?
”भूमिका योग्य वाटली नाही”,परेश रावल यांनी अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ चित्रपट नाकारला, म्हणाले..
करण या अफवांबद्दल सध्या काहीही बोलेला नाही, पण त्याने इंस्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर करून चाहत्यांचे उत्साह वाढवला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले:”मी ही घोषणा करतो की, माझा कमबॅक बहुतेक लोकांच्या अपेक्षेपेक्षा मोठा असेल. विश्वास ठेवा”
करणच्या कमबॅकमुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.






