(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
“बॉलीवूड अभिनेता परेश रावलहे यंदा ‘हेरा फेरी 3’ मुळे खूप चर्चेत होतं. त्यांनी आधी हा सिनेमा सोडला होता, पण नंतर मोठा गदारोळ झाला, वाद झाला तेव्हा त्यांनी परत चित्रपटात काम करण्यास होकार दिला. परेश रावल यांनी विनोदी, खलनायक आणि सहाय्यक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते नेहमीच विविध विषयांवर ठाम मत मांडतात. सध्या ते त्यांच्या ‘थामा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘थामा’ मध्ये ते आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.आता बातमी आहे की ते अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ मध्येही असण्याचे ठरले होते, पण त्यांनी ते करण्यास नकार दिला आहे.
‘दृश्यम’ फ्रँचायझीची सुरुवात 2013 मध्ये जीतू जोसेफच्या मल्याळम आवृत्तीमध्ये मोहनलालसोबत झाली होती, जी नंतर 2015 मध्ये हिंदीमध्ये बनवली गेली आणि त्यात अजय देवगण याला कास्ट केले गेले. दोन्ही भाषांमध्ये दोन-दोन भाग आले असून तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.
लेस्बियन टॅग आणि सिगारेट वादामुळे एका रात्रीत चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
आता परेश रावलने खुलासा केला आहे की त्यांना ‘दृश्यम 3’ मध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका करण्यासाठी संपर्क केला गेला होता. पण त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना रावल म्हणाले, ”हो, मेकर्सनी माझ्याशी संपर्क केला होता. पण मला वाटले की काही भूमिका माझ्यासाठी योग्य नाहीत, मला मजा आली नाही.”
परेश रावल यांनी ‘दृष्यम ३’च्या स्क्रीप्टचे कौतुक करत म्हटले, ”स्क्रीप्ट खूप छान आहे, मला ती खूप आवडली; पण स्क्रीप्ट कितीही चांगली असली तरी तुमची त्यातील भूमिका तितकीच चांगली असावी लागते, नाहीतर मजा येत नाही.”
नेटफ्लिक्सवर झळकली ‘सुंदरा’, अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
सध्या परेश रावल आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानासोबत ‘थामा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर झळकत आहेत. यात नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. ‘थामा’ २१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांसमोर प्रदर्शित झाला.






