YouTube Village Tulsi Chhattisgarh A village of viral youtubers
सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या हटक्या क्रिएटिव्हीटीच्या जोरावर कधी कोणाला प्रसिद्धी मिळेल काहीही सांगू शकत नाही. सोशल मीडियामुळे लोकांना आपलं टॅलेंट दाखवणं फार सोप्प झालं आहे. अनेक लोकं तर आपल्या कामाच्या सोबतच सोशल मीडियावरही रिल्स बनवतात आणि सोशल मीडियावर पैसे कमावतात. आज मी तुम्हाला एक असं गाव सांगणार आहे, त्या गावातली लोकं काही वर्षांपूर्वी शेतीच्या कामावर, मजूरी आणि छोट्या व्यवसायांवर अवलंबून राहायचे. पण आज त्या गावातल्या लोकांची ओळख बदललीये. आपल्या कामाच्या सोबतच रिल बनवणारे हे गावकरी आता पूर्ण दिवस इन्स्टाग्रामवर रिल बनवत पैसे कमावत आहेत. तिथल्या लोकांचं सोशल मीडियाने आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकलं आहे, नेमकं असं कोणतं गाव आहे, चला तर जाणून घेऊयात.
“अ परफेक्ट मर्डर”चा होणार महिलांसाठी विशेष प्रयोग, जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार ?
पुरुष असोत, महिला असोत किंवा लहान मुलं इथले सर्वजण यूट्यूबवर व्हिडिओ तयार करून पैसे कमावत आहेत. काही जणांनी तर एवढे यश मिळवले की त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ कंटेंट क्रिएशन सुरू केले. युट्यूबवर व्हिडिओ बनवून पैसे कमावणारं गाव छत्तीसगढमधील रायपुर जवळ असलेल्या या गावाचं नाव ‘तुळसी गाव’ असं आहे. ह्या गावाची चर्चा फक्त तिथल्या आजुबाजुच्या गावातच नाही तर, संपूर्ण छत्तीसगढमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. काही वर्षांपासून या गावातील काही तरुण आपल्या रोजच्या आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं ठरवून एकत्र आले होते. त्यांनी कॉमेडी, माहिती आणि सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला बनवलेले काही व्हिडिओ फारसे काही चालले नाहीत.
30 वर्षानंतर राज ठाकरेंना भेटली सोनाली बेंद्रे, व्हिडिओ व्हायरल आणि चर्चांना उधाण
पण काही आठवड्यांनंतर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि त्यांच्या चॅनेलवर लाखों व्ह्यूज आले, त्यानंतर सबस्क्रायबर देखील वाढले.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि चॅनलला लाखो सब्सक्राईबर मिळाल्यानंतर त्यांनी आपलं लक्ष व्हिडिओंवरच वळवलं. गावातल्या अनेक तरुणांना व्हिडिओ बनवण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी सुरू केलेल्या या कामाने त्यामुळे महिन्याला त्यांना एवढी कमाई सुरू झाली की त्यांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या आणि पूर्णवेळ यूट्यूबला दिला. त्यांच्या यशाने गावातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळाली. हळूहळू गावातील शेतकऱ्यांनी, महिला गृहिणींनी, लहान मुलांनी त्यासोबत आजी-आजोबांनीही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. ‘तुळसी’ गावातल्या लोकांनी युट्यूबवर कुकिंग व्हिडिओ, कोणी डान्स, कोणी मोटिवेशनल स्पीच, तर कोणी मजेशीर स्किट्सचा व्हिडिओ तयार करून लोकाचं एंटरटेन्मेंट केलं आणि पैशे कमवले.
कियारा- सिद्धार्थच्या घरी गोंडस बाळाचे होणार आगमन; चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी!
वेगवेगळ्या काँटेंटच्या व्हिडिओ बनवण्याचा फायदा गावातल्या महिलांना सर्वाधिक फायदा झाला. खरंतर त्यांच्यासाठी हा लाईफमधला एक अमुलाग्रह बदलच होता. पूर्वी फक्त ‘चुल आणि मुल’ आणि घरापर्यंत मर्यादित असलेल्या महिलांना यूट्यूबमुळे नवी ओळख मिळाली. अनेक महिलांनी स्वयंपाक, फॅशन, शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांवर आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले आणि त्या आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तर बाकीच्या महिलाही स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. खरंतर, युट्यूबमुळे ‘तुळसी’ गावाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदलली. गावात आता स्टुडिओ उभारले गेले असून प्रोडक्शन हाऊसही सुरू झाले आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला. आज या गावातील काही यूट्यूबर्स प्रादेशिक चित्रपटसृष्टीतही पोहोचले आहेत आणि मोठमोठ्या ब्रँड्ससोबत काम करत आहेत.