Sonali Bendre And Raj Thackeray News
निमित्त होतं, “मराठी भाषा गौरव दिना”चं… २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. कार्यक्रमाला विशेष उपस्थितीसह मान्यवरांनी मराठीतील काही दर्जेदार कवितांचं वाचनही करण्यात आलं. पण या सर्व कार्यक्रमामध्ये लक्ष वेधले ते अभिनेत्री सोनाली बेंद्रेने… अभिनेत्री सोनाली बेंद्रेसह मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
“मी स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीयन बोलायला संकोचते…” भर स्टेजवर सोनाली बेंद्रे असं का म्हणाली ?
२७ फेब्रुवारीला झालेल्या वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्त मनसेकडून गायिका आशा भोसले, संगीतकार आणि गायक जावेद अख्तर, पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ, आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, विक्की कौशल, लक्ष्मण उतेकर आणि शर्वरी वाघ या दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी सोनाली “मराठी भाषा गौरव दिना”च्या कार्यक्रमाला आली होती. सोनाली एक अभिनेत्री म्हणून इथं हजर राहिली असली तरीही तिच्या काव्यवाचनानं साऱ्यांच्याच मनाचा ठाव घेतला.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे, शर्मिला ठाकरे आणि नेते राज ठाकरे हे तिघंही एकाच फ्रेममध्ये दिसले. या तिघांच्याही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिघंही एकत्र उभे राहून एकमेकांसोबत बोलताना दिसत आहे. सोनाली बेंद्रे आणि शर्मिला ठाकरे दोघीही एकमेकींसोबत बोलताना दिसत आहे. शिवाय एकमेकींसोबत हसतानाही दिसत आहे. जुने रुसवे फुगवे विसरून सोनालीने नेते राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. तब्बल ३० वर्षांनंतर दोघं एकमेकांसमोर आले आहेत. दरम्यान, एकेकाळी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या.
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ सांगणार लग्नानंतरची गोष्ट, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे ९०च्या दशकात प्रेमसंबंधात होते असे म्हटले जाते. सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनीही खूप मदत केली होती, असंही म्हटलं जातं. पण त्या दोघांनीही केव्हाच नातं जाहीरही केलं नव्हतं आणि स्विकारलंही नव्हतं. सोनाली बेंद्रेचा पहिला वहिला ‘आग’ चित्रपट पाहून राज ठाकरे तिच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. लग्न होऊनही राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे होते, असे बोलले जाते. ठाकरे यांनाही सोनालीशी लग्न करायचे होते पण त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा लग्न करण्यापासून रोखले होते, असे बोलले जाते.